Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन तर्फे कर्जत रेल्वे...

ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन तर्फे कर्जत रेल्वे स्थानकावर भोजन दान !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन शाखा कर्जत – नेरळ यांच्या वतीने महामानव – क्रांतीसुर्य – बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमीला येणाऱ्या भीम अनुयायासाठी भोजन दानाचा कार्यक्रम कर्जत रेल्वे स्थानकावर दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी राबविण्यात आला.यावेळी या भोजनदानाचा अनेक आंबेडकरी अनुयायी यांनी लाभ घेतला.
आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ( DEE OHE KALYAN) श्री सुरेश साहेब तसेच नवीन नियुक्त झालेले (SSE OHE) श्री अशोक झा साहेब ,(DY SS KJT ) आयु. मोरेश्वर ढाके साहेब ,( SSE S&T) आयु. प्रशिक डाळिंबकर , सेवानिवृत्त मेल गार्ड सुनील चव्हाण साहेब , आयु.अशोक आल्हाट , आयु.राजेश अन्सारी, आयु.हरेश जगताप,आयु.संतोष सोनवणे ,आयु.विश्वनाथ रणपिसे, आयु.बॉबी वाघमारे , आयु.विजय भालेराव , शुभांगी गांगुर्डे, आयु.संजय गार्डे ,आयु.सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संपूर्ण ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन शाखा कर्जत – नेरळ चे सभासद व पदाधिकारी यांनी कार्यक्रम साजरा करण्यात मोलाचे योगदान दिले.
संघटनेचे जेष्ठ सल्लागार आयु. सुनील कांबळे , कल्याण एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन शाखेचे माजी अध्यक्ष आयु बी एच गायकवाड , सेवानिवृत्त आयु. गौतम सकपाळ , पर्यावरण सल्लागार विकास त्रिभुवन व सामजिक कार्यकर्ते राजू रोकडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

You cannot copy content of this page