Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची रायगड जिल्ह्यात धावती...

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची रायगड जिल्ह्यात धावती भेट..

खोपोली( दत्तात्रय शेडगे)
ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी रायगड जिल्ह्यातील कलंबोळी येथे धावती भेट देऊन कार्यकर्त्यांनी भेट घेतल्या कोकणात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जोरात काम चालू आहे,या संघाच्या माध्यमातून प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन समाज बांधवांच्या अडचणी जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देऊन आपल्या समाजातील मुले जास्तीत जास्त कशी शिकतील यावर ते जास्त भर देत आहेत तर या शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात नेहमी अग्रेसर असते.


कोकणात ऑल इंडिया धनगर समाजाच्या नवीन पदाधिकारी यांच्या नुकत्याच निवडी करण्यात आल्या आहेत, त्यातच रायगड जिल्ह्यातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत, त्यामुळे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी नुकतीच कळंबोली येथे भेट देऊन कार्यकत्यांनी बैठक घेतली, व आगामी काळात संघटनेची ध्येय धोरणे आणि कामाची दिशा यावर सविस्तर चर्चा केली.

प्रवीण काकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित रायगड जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष विश्वजित नांगरे पाटील आणि कळंबोली शहर अध्यक्ष तुकाराम कोळेकर यांना निवडीचे पत्र दिले,तर पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्याने पदाधिकारी यांच्या नवचैतन्य पसरले आहेत.

यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका मोनिकाताई प्रकाश महानवर ऑल इंडिया धनगर महासंघ रायगड जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे, प्रकाश महानवर, सचिव नयन सिद राज्य संघटन मंत्री दयानंद ताटे ,मुबंई प्रदेश अध्यक्ष सुभाष येले, रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अर्चना शिंदे, पनवेल तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर दडस,आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page