Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशनच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस...

ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशनच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

लोणावळा (प्रतिनिधी): परमपूज्य बौद्धीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महा परीनिर्वाण दिनानिमित्त ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंन्स फेडरेशन लोणावळा शहराच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
दलितांचे कैवारी राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महा परिनिर्वाण दिनी लोणावळा शहर ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशनच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस पुष्प हार अर्पण करून व कॅण्डल लावून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम लोणावळा नगरपरिषद कार्यालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाला.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, सचिव सचिदानंद बलराज, कार्याध्यक्ष बी. बी. गोसावी, उपाध्यक्ष दिलीप पवार, खजिनदार सुनील गोसावी तसेच सदस्य दत्ता केदारी, विलास कांबळे, जयसिंग कांबळे, सुल्तान शेख, रामचंद्र वंजारी, मिलिंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page