Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाओम चैतन्य कानिफनाथ महाराज अस्थाना सिद्धार्थ नगर येथील पालखी सोहळा उत्सहात संपन्न…

ओम चैतन्य कानिफनाथ महाराज अस्थाना सिद्धार्थ नगर येथील पालखी सोहळा उत्सहात संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी):ओम चैतन्य कानिफनाथ आस्थाना लोणावळा पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी सिद्धार्थनगर ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यांचा पालखी सोहळा उत्सहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सकाळी साडेदहा वाजता सिद्धार्थ नगर लोणावळा येथून झाले. यावेळी खोपोलीचे गुरुवंदना ढोल ताशा पथक या ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत पालखी दुपारी तीन वाजता चैतन्य कानिफनाथ मठ भुशी या ठिकाणी पोहोचली.
मागील पाच वर्षांपूर्वी या पालखी सोहळ्याला चैतन्य कानिफनाथ आस्थाना चे प्रेरणास्थान कै.जयसिंग दादा बोभाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून सालाबादप्रमाणे दरवर्षी पालखीचे आयोजन संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य सोमनाथ बोभाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. यावेळी अध्यक्ष अंकुश कोंडीराम मानकर,कार्याध्यक्ष सागर कोंढभर,उपाध्यक्ष अभय लोंढे व भक्त भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page