Thursday, June 1, 2023
Homeपुणेलोणावळाओम संदीप डेनकर हा ICSE बोर्ड 10 वी च्या परीक्षेत लोणावळ्यात प्रथम…

ओम संदीप डेनकर हा ICSE बोर्ड 10 वी च्या परीक्षेत लोणावळ्यात प्रथम…

लोणावळा(प्रतिनिधी) : रायवुड इंटरनॅशनल स्कूल चा इयत्ता 10 मधील विद्यार्थी ओम संदीप डेनकर याने लोणावळा शहरात आयसीएसई (ICSE) बोर्डाकडून परीक्षा देऊन 96% गुण मिळवून घवघवीत यश संपादन करून लोणावळा शहरात प्रथम यआला आहे. त्याच्या या यशाने लोणावळ्याचे नाव लौकिक वाढविला आहे.
सध्या ओम हा पुढील शिक्षणासाठी राजस्थान (कोटा) येथे गेला असून भविष्यामध्ये आयआयटी क्षेत्रामधून शास्त्रज्ञ होण्याचा मानस असून या यशाचे श्रेय त्याने आई वडील व गुरुजनांना दिले आहे. हे यश कमी वेळात जास्त अभ्यास करून लक्षात कसा ठेवायचा याचे गमक मी त्यांच्याकडून शिकलो व एकाग्रता केली असे ओम संदीप देनकर यांनी सांगितले.
भविष्यामध्ये थोडे यशाने हुरळून न जाता मी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page