
वाकसई : श्री संत तुकाराम नगर येथील ओम साई मित्र मंडळाचा 9 वा वर्धापन दिन उत्सहात साजरा.
सालाबादप्रमाणे यंदाही ओम साई मित्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त होम हवन, दुपारची आरती, सायंकाळी 7 वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. व भजनाच्या कार्यक्रमास सर्व महिला व पुरुष मंडळींच्या उपस्थितत ओम साई मित्र मंडळाचा 9 वा वर्धापन दिन भक्तीमय वातावरणात मोठया उत्सहात संपन्न झाला.यावेळी मंडळाचे सर्व जेष्ठ कार्यकर्ते व युवा कार्यकर्त्यांबरोबर किलबिल मंडळीही मोठया संख्येने उपस्थित होते.