Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडओम साई सेवा मंडळ - भिसेगाव यांच्या वतीने प्रती शिर्डी-शिरगाव पायी दिंडी...

ओम साई सेवा मंडळ – भिसेगाव यांच्या वतीने प्रती शिर्डी-शिरगाव पायी दिंडी सोहळा संपन्न !

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे)ओम साई सेवा मंडळ – भिसेगाव ता. कर्जत यांच्या वतीने श्री साईबाबा पायी दिंडी पालखी सोहळा भिसेगाव ते प्रती शिर्डी ( शिरगाव ) शुक्रवार दि . २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आला होता . यावर्षी ओम साई सेवा मंडळाचे हे ३ रे वर्षे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन होते.यावेळी भिसेगाव व पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी व महिला वर्गाने या पायी दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.

श्री साईनाथ महाराज पायी दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील शुक्रवार दि. २३ डिसेंबर रोजी भिसेगाव साई गजानन मंदिर येथून सकाळी ७ वाजता साई भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने ढोल ताश्याच्या गजरात प्रस्थान झाला . सायमाळ स्टॉप खंडाळा घाट , महादेव मंदिर वळवण लोणावळा येथे वस्ती करून नंतर दुसऱ्या दिवशी साईधाम कान्हा फाटा जय मल्हार हॉटेल – वडगाव येथून पुन्हा प्रस्थान होऊन ११ वाजता दर्शन घेऊन १२ वाजता या पायी दिंडीचा समारोप झाला.
यामध्ये विनोद ( शानु ) डुलगज , शरद हजारे , मंगेश घोलप , ओंकार गोसावी , संजय हजारे ( पोलीस पाटील – भिसेगाव ) , रुपेश क्षीरसागर , या प्रमुख साईभक्तांनी पुढाकार घेतला होता .या प्रती शिर्डी – शिरगाव पायी दिंडी सोहळ्यात अनेक साई भक्तांनी सहभाग घेतला . या साई पालखीचा भंडारा गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ रोजी श्री साई गजानन मंदिर – भिसेगाव येथे संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत संपन्न होणार आहे . सदरच्या पायी दिंडी सोहळ्यात चहा – नाश्ता – जेवण ओम साई सेवा मंडळ – भिसेगाव , ता. कर्जत यांच्यातर्फे करण्यात आले .तर अनेक साई भक्तांनी दान दिले आहे.

You cannot copy content of this page