
लोणावळा : द इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप लोणावळा गिल्ड तर्फे व्ही पी एस हायस्कूलच्या प्रांगणात शनिवार ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य सचिव डॉ. अमोल कालेकर यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी थोर समाजसेवक धीरुभाई कल्याणजी टेलर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र स्काउट गाईड फेलोशिपच्या पी आर ओ संतोषी तोंडे उपस्थित होत्या.
गिल्डचे अध्यक्ष अशोक घाडगे, सचिव सुनिल शिंदे, खजिनदार सुरेश गायकवाड, महिला उपाध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड यांच्या अथक प्रयत्न आणि श्रमातून कार्यक्रमाची यशस्वी पूर्तता झाली.
याप्रसंगी आशीष जांगीर, गणेश कांबळे, श्रावणी कामत, संगीता कांबळे, नीतू पुजारी, सायली जोशी, हेमलता शर्मा, धीरज निकम, संपत चव्हाण, नंदिनी कामत, पूर्वा शिंदे इ. सदस्यांनी समुहगीते, समुहनृत्ये, टाळ्या-आरोळ्या इ. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन कार्यक्रमात रंग भरले.
धीरुभाई टेलर यांच्या शुभहस्ते शेकोटी प्रज्वलित करण्यात आली, याप्रसंगी त्यांनी गील्डच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विशेष नैपुण्य प्राप्त बालक व सदस्यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
सामुहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व शशिकांत भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगान करुन कार्यक्रमाची सांगता झाली.