Thursday, June 1, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतकरांची सुरक्षिततेसाठी कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे एक पाऊल पुढे !

कर्जतकरांची सुरक्षिततेसाठी कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे एक पाऊल पुढे !

उल्हास नदी संवर्धनासाठी साफसफाई करण्यास सुरुवात..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील उल्हास नदी कर्जतकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची नदी असून तिचे सौंदर्य टिकवणे करीता तीचे संवर्धन करणे व नागरिकांची पावसाळ्यात वाढणाऱ्या पाण्यामुळे सुरक्षा करणे खूप गरजेचे आहे , याचा पाठपुरावा सातत्याने कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे करत आहेत . नदी संवर्धनामुळे नदीच्या सौंदर्या सोबत तिचा स्वच्छतेचाही प्रश्न मार्गी लागावा म्हणून आज श्रीराम पुलाजवळ नदीच्या पात्रात पोकलण च्या साहाय्याने स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली . असे या उल्हास नदी स्वच्छता अभियानाचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी देखील आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी नदीचा गाळ काढला होता . त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळे कर्जतकर नागरिकांचे सुरक्षा जपण्यास खूपच मदत झाली होती.

कर्जत शहरात दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका असतो. उल्हास नदीत पाण्याची पातळी ओलांडल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे सामानाचे अतोनात नुकसान होते . यामुळे दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीला रोखता येऊ शकण्यासाठी आज याच पार्श्वभूमीवर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. कर्जत शहरातुन जाणारी उल्हास नदी पात्रातील साफसफाई, जलपर्णी काढणे ,नदी रुंदीकरण ,नदीतील गाळ काढणे याचे काम कार्यतत्पर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून होत आहे, दरवर्षी होणारी नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी जे काम आपण हाती घेतले आहे यात पोखलण च्या साहाय्याने श्रीराम पुल परिसरातील नदी प्रवाहात वाढलेली झाडी झुडपांची साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले.
त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पुरापासून नागरिकांची सुरक्षा होणार आहे.आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी टाकलेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद असल्याचे कर्जतकरांच्या वतीने बोलले जात आहे.

You cannot copy content of this page