Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये आमदार चषक डे - नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन…

कर्जतमध्ये आमदार चषक डे – नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शिवसेना शहर आयोजित ” पुन्हा एकदा साहेबच – २०२४ ” , आमदार चषकाचे आयोजन कर्जत नगर परिषद हद्दीत बामचा मळा मैदान, दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड येथे मुद्रे विभाग प्रमुख राकेश दळवी , दहिवली विभाग प्रमुख केतन बामणे व कर्जत शहर अल्पसंख्यांक प्रमुख आकीब पाटील यांच्या नियोजनात डे – नाईट ओव्हर आर्म क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले असून या सामन्यांचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी श्री गणेश पूजन शिवसेनेचे नेते मनोहर दादा थोरवे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस शहर संघटक नदीम भाई खान यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले . यावेळी शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , रोहित ओसवाल , दिनेश कडू , मुद्रे विभाग प्रमुख राकेश दळवी , दहीवली विभाग प्रमुख केतन बामणे, अल्पसंख्याक प्रमुख आकिब पाटील , भिसेगाव विभाग प्रमुख शरद हजारे , उपसंघटक सचिन खंडागळे , ओमकार गोसावी , अशोक मोरे , मानकर दादा , मोधळे , अनुप साबणे , त्याचप्रमाणे शिवसेना – युवा सेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सदरचे क्रिकेटचे सामने बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ ते शनिवार दि. १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत बामचा मळा ग्राऊंड, दहिवली, ता. कर्जत, येथे ग्रामीण टेनिस क्रिकेट चे मर्यादित षटकांचे प्रकाश झोतात डे – नाईट सामने आयोजित केले असून या सामन्यात प्रथम विजेत्या संघास १ लाखाचे बक्षीस व आकर्षक ट्रॉफी तर द्वितीय विजेत्यास ५० हजार व आकर्षक ट्रॉफी त्याचप्रमाणे अशी अनेक बक्षिसे संघास तसेच खेळाडूस मिळणार आहेत.

यावेळी प्रथम सामना आंजप विरुद्ध आंजरून यांच्याविरुद्ध झाला . यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांकडून शाल , सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला . या सामन्यांचे प्रक्षेपण विश्लेषण संतोष चौधरी व संदीप गायकवाड यांच्या सुमधुर आवाजात करण्यात येत आहे .पहिल्या दिवशी १० सामने खेळविण्यात आले . यावेळी क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट सामने बघण्यास खूप मोठी गर्दी केली होती.
- Advertisment -

You cannot copy content of this page