Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये गोकुळ किड्स कॉन्व्हेन्ट स्कूलचा " अन्युल डे " उत्साहात साजरा !

कर्जतमध्ये गोकुळ किड्स कॉन्व्हेन्ट स्कूलचा ” अन्युल डे ” उत्साहात साजरा !

विद्यार्थ्यांबरोबरच ” पालकांनी ” देखील घेतला आनंद..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) योगेश्वरी फाऊंडेशन बदलापूर संचालित ” गोकूल किड्स कॉन्व्हेंट स्कूल “या शाळेचा कर्जतमध्ये वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम अण्युल – डे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी देखील विविध खेळांत भाग घेवून आनंदोत्सव साजरा केला . त्यामुळे या कार्यक्रमास उत्साहवर्धक वातावरण तयार झाले होते . यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कला , डान्स , खेळ , वेशभूषा सादरीकरण केले.


सहा वर्षांपूर्वी कर्जत नगर परिषद हद्दीतील नाना मास्टर नगर येथे ” गोकुळ किड्स कॉन्व्हेन्ट स्कूलचे ” लावलेले रोपटे आता वटवृक्ष झाले असून यांत संस्थेचे संचालक प्रमोद जाधव सर् व मनिषा जाधव मॅडम त्याचप्रमाणे शाळेच्या टीचर यांनी अपार मेहनत घेवुन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व अभ्यास घेवून शैक्षणिक – सांस्कृतिक – कला – क्रिडा यांत योग्य संस्कार देवून निपुण केले आहे . ” प्ले ग्रुप , नर्सरी , जेआरकेजी , एसआरकेजी आणि ऍक्टिव्हिटी सेंटर ” असलेल्या या गोकुळ किड्स कॉन्व्हेन्ट स्कूलचा शैक्षणिक आलेख खूप साजेसा असून आम्ही दोघेही पती पत्नी कामावर असल्याने आमच्या पाल्याची शैक्षणिक प्रगती बघता आम्हाला आनंद होत असल्याचे शाळेला ” शाबासकीची थाप ” देत मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक चौरे साहेब यांनी दिली.


गोकुल किड्स कॉन्व्हेन्ट स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता हॉटेल रॉयल गार्डन हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक चौरे साहेब , पत्रकार सुभाष सोनावणे , बेधडक महाराष्ट्र चे संपादक अभिजित दरेकर , समाज सेवक संतोष अभंगे , समाज सेविका सौ. शिल्पा अभंगे , उद्योजक तुषार बनसोडे , शाळेचे ट्रस्टी प्रमोद जाधव सर् , मुख्याध्यापिका मनिषा जाधव मॅडम , ट्रस्टी प्रतिक जाधव , त्याचप्रमाणे शाळेचे टीचर कर्मचारी मॅडम उपस्थित होते . यावेळी प्रमुख पाहुण्यांनी तसेच पालकांनी देखील शाळेची देखभाल , अभ्यास , मुलांची हुशारी , प्रगती याबद्दल शाळेचे व टीचर यांचे कौतुक केले व शाळेला शुभेच्छा दिल्या.


सर्व मान्यवरांचे शाल – पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले तर खेळ व कार्यक्रमात अव्वल ठरलेल्या सांन्वी , सांन्वी , शौर्य , काव्या , तीर्थ , अनिशा , रुही , ओवी , कबीर , रुबवी , मोहम्मद अली , वर्धन , सई , पूर्वा , गौरव , पियूष , शिव , हुहशी, अंशुल , सांन्वी , अभा , दुरेश , सिध्दीका , आरोही या विद्यार्थ्यांना व खेळात विजयी झालेल्या पालकांना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page