Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये चोरांचा सुळसुळाट ,नागरिकांचे जनजीवन अस्थिर !

कर्जतमध्ये चोरांचा सुळसुळाट ,नागरिकांचे जनजीवन अस्थिर !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) चोरी झाल्यावर चोराला पकडणे , ही खूप सोपी गोष्ट आहे , मात्र चोरी होण्याअगोदरच चोराची गोठडी गुंडाळणे , हि फार मोठी गोष्ट आहे , मात्र हि बाब आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात दिसत नसल्याने कधी दिवसा तर कधी रात्री चोरांचा सुळसुळाट सर्वत्र पाहण्यास मिळतो . कर्जत शहरात याच बाबींमुळे कर्जतकर नागरिकांची सुरक्षा धोक्यात वाटत आहे .कर्जत शहरात चहुबाजुने चोरांचा सुळसुळाट सुरू असून यास प्रतिबंध करण्यास , पोलीस यंत्रणा कमी पडत आहे.

गेल्या १ महिन्यापासून थंडीचा मौसम बघून कर्जत शहरात चोरांचा सुळसुळाट सुरू आहे . भिसेगाव परिसरातील पाल टॉवर येथे भर दुपारी एका महिलेच्या घराचा कुलूप तोडून चोराने दागिने , पैसे चोरले , तर जुने एस टी स्टँड जवळील सुजित धनगर यांची बुलेट तर महावीर पेठ येथील देखील पारस यांची बुलेट चोरट्यानी चोरली होती , त्यातील सुजित धनगर यांची बुलेट साजगाव – खोपोली येथे सापडली.
काल देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना विठ्ठलनगर या उच्च वर्ग सोसायटी परिसरात पहाटे व रात्री चोर आलेले असताना सर्वांचीच झोप उडाली , या परिसरात सातत्याने हा प्रकार होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे .यापूर्वी पाटकर मॅडम , माई महामुनकर यांच्या घरी देखील चोरी झालेली असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून , जनजीवन अस्थिर झाले आहे.
कुठे बाहेर गेल्यास आपल्या घरी चोरी होईल की काय , अशी भीती सर्वांना वाटत आहे.याबाबतीत तीन ते चार चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून येथील सर्व नागरिकांनी काल रात्री पोलीस ठाण्यात जाऊन याबाबतीत निवेदन दिले आहे.

You cannot copy content of this page