Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " छत्रपती शिवाजी महाराज " यांच्या जयंती दिनी आर पी आय...

कर्जतमध्ये ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या जयंती दिनी आर पी आय पक्षातर्फे अभिवादन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जतमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) तालुका कर्जत यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभे केले परंतु स्वतः साठी एक ही राजवाडा न बांधता रयतेसाठी लढले , असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३५२ व्या जयंती निमित्त कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या स्मारकाला कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी , महिला वर्ग उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करुन महाराजांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.


यावेळी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष आयु . हिरामणभाई गायकवाड , आर.पी.आय कर्जत तालुका महिला अध्यक्ष सौ. अलका सोनावणे, आर.पी.आय कर्जत शहरध्यक्ष सौ. वैशाली भोसले , आर.पी.आय कोकण प्रदेश युवा सरचिटणीस जिवक गायकवाड , कर्जत तालुका उपाध्यक्ष आयु. किशोर गायकवाड , तालुका उपाध्यक्ष अंकुश सुरवसे , तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड , माजी तालुका महासचिव आयु . गौतम ढोले , तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे , गणेश गायकवाड , गणेश सुरवसे , संतोष सुरवसे, अक्षय जाधव असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी महाराजांचा घोषणा देवून जयघोष करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page