कर्जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची अनोख्या उपक्रमाने जयंती साजरी !

0
223

वंचितचे ता.अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांच्या आवाहनाने हजारो वह्या व पेन जमा…

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )शिक्षणाच्या जोरावर भारतीय राज्य घटना लिहून तमाम भारतीयांना हजारो अधिकार बहाल करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती दिन . शिक्षणासाठी आवश्यक असणारे वही आणि पेन यांस अनन्य साधारण महत्व आहे . कोरोना काळात गरीब – गरजू कुटुंबांची वाताहात झाली असताना हाताला काम नसणारे हजारो हात पोटाची खळगी कशी भरायची या विवंचनेत असताना शिक्षणासाठी चिल्या – पिळयांना शैक्षणिक साहित्य कुठून आणायचे , या विचारात असताना बहुजन समाजात काम करून त्यांची समस्या सोडविणारे वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांनी ह्या वर्षीची ” घटनाकारांची ” जयंती अनोखे उपक्रमाने साजरी करण्याचे ठरविले व गोरगरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन असेल , अशी हाक दिली.

त्यानुसार हजारो हातांनी वह्या व पेन देऊन सहकार्य केले .
कर्जतमध्ये यावर्षी ऐतिहासिक अशी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वंचित चे ता . अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्रदादा यादव, अनिल गवळे, सुनिल आप्पा गायकवाड, प्रदीप ढोले यांनी केलेल्या आव्हानानुसार कर्जत तालुक्यातील आंबेडकर अनुयायी, नागरीकांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कर्जतमध्ये स्मारकाजवळ आल्यावर वही व पेन आणा , या संकल्पनेला खुप मोठा प्रतिसाद दिला. यामुळे कर्जत मध्ये ऐतिहासिक जयंती उत्सव साजरी करण्याचा पायंडा सुरू झाला.


प्रत्येक वर्षी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप जल्लोष्यात ,धूमधडाक्यात,डीजे,मिरवणूक,कवाळी, आदी इतर कार्यक्रमाने साजरी करत असतो,परंतु गेल्या 2 वर्षात जगभरात कोरोना संसर्गाने समाजातील आपले नातेवाईक,समाज बांधव,मित्र परिवारावर ह्या आजाराने आघात केला आहे.

कोणाच्या नोकऱ्या गेल्या,व्यवसाय,धंदे बंद झाल्यामुळे काहींना आपल्या मुलांचं शिक्षण करणं अवघड होत आहे. डॉ . बाबासाहेब म्हटले होते,शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे , ते प्राशन करणे सर्वांचा अधिकार आहे , म्हणून आपण ह्या वर्षी जयंतीचा कार्यक्रम म्हणून ” एक हात मदतीचा ” या संकल्पनेतून समाजातील गरजू व कोरोना काळात ज्या मुलांचं डोक्यावरच छत हरपलं आहे.

अशा आपल्या वस्तीतील, गावातील, नातेवाईक, मित्र परिवारातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन बाबासाहेबांच्या विचारांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी करण्या मागची संकल्पना अंमलात आणली , हे अभियानाचे आज रोजी उदघाटन करण्यात आले. सदरचे अभियान १० मे पर्यत सुरू राहणार आहे.


सदर कार्यक्रमाचे उदघाटन आज सकाळी १० वाजता करण्यात आले. यावेळेस ऍड . कैलास मोरे, हरिश्चंद्रदादा यादव, अनिल गवळे, धर्मेंद्रदादा मोरे, प्रदीप ढोले, विकी जाधव, अशोक कदम, जगदीश गायकवाड, कमलाकर जाधव ,नंदू जाधव , सुनील गवळे , सुनील वाघमारे , कर्जत विकास संघर्ष समितीचे सदस्य तसेच अनेक आंबेडकरी अनुयायी व कर्जतमधील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.