![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
१६ व १७ मे २०२५ रोजी होणार जल्लोष !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ” तथागत भगवान गौतम बुद्ध – सम्राट चक्रवर्ती अशोक – छत्रपती शिवाजी महाराज – राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले – छत्रपती शाहू महाराज – विश्वरत्न महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” या महापुरुषांची संयुक्त जयंती ” भीम महोत्सव २०२५ ” पर्व ८ वे शुक्रवार दि. १६ मे व शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी ” रॉयल गार्डन कर्जत ” , जि. रायगड येथे मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्तपणे साजरा होणार असून या निमित्ताने विविध प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भीम महोत्सवात शुक्रवार दि. १६ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वा. ध्वजारोहण – जेष्ठ धार्मिक कार्यकर्ते यांच्या हस्ते होणार आहे . सूत्र पठण – सर्व बौद्ध धार्मिक संगठना तर सायं. ४.३० ते ७.०० वा. वकृत्त्व स्पर्धा व गीत गायन स्पर्धा , सायं. ७.०० ते ८.३० वा. प्रबोधनपर कार्यक्रम ” विषय – महाबोधी विहार ते संविधान वर्तमान स्थिती ” , महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक, बहुजन विचारवंत, प्रबोधनकार प्रा. सुभानअली शेख – संस्थापक – मराठी मुस्लिम समाज चळवळ , संयोजक – दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान , Bse (Microbiology), B.Ed. From BAMU MJ (Master Of Journalism and Mass Communication) From SRTMU. यांचा प्रबोधनपर कार्यक्रम तर समाप्ती नंतर भोजन व्यवस्था करण्यात आली आहे , तर रात्री ८.३० ते ११.३० वा. रिकी मुंढे आणि किरण कदम प्रस्तुत ” ऑर्केस्ट्रा ड्रीम मेलोडीज ” सादरकर्ते चंद्रकांत प्रल्हाद शिंदे ( शिंदे शाही ) , मंजुषा शिंदे (लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात फेम ) , सोनाली सोनवणे (मौसम आहे मस्ताना फेम) , अजय देहाडे (झी युवा संगीत सम्राट काळजावर कोरल नाव भीमा कोरेगाव फेम) , प्रीतम बावडेकर (सारेगमप फेम) , राजरत्न भोसले (सुप्रसिद्ध गायक) , नवीन मोरे (संगीतकार) यांचा सुमधुर आवाजातून गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तर शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी सायं. ६.३० ते ११.३० महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात व डी जे च्या तालावर आयोजित करण्यात आली आहे , तर मिरवणूक समाप्ती नंतर आलेल्या सर्व भीम अनुयायी , महिला भगिनींसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे . तरी कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व नागरिक , बौद्ध बांधव , आंबेडकरी अनुयायी , बहुजन वर्ग यांनी या ” भीम महोत्सव – २०२५ ” पर्व ८ वे या महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवात सर्वांनी मोठ्या संख्येने रॉयल गार्डन कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड येथे सहभागी होण्याचे निमंत्रण , निमंत्रक भीम महोत्सव समिती, कर्जत यांनी केले आहे.