if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल , कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व कर्जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आज कर्जत चार फाटा येथे सोमवार दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० – ३० वाजता जाहीर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी कर्जत तालुका राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते तानाजी चव्हाण , कर्जत शहर कार्याध्यक्ष राजेश दादा लाड , सागर भाऊ शेळके (अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस – कर्जत तालुका ) , जगदीश ठाकरे , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे ,भूषण पेमारे , नोमान नजे , वीरेंद्र जाधव , आर्केश काळोखे (अध्यक्ष – राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना – कर्जत) , राजू हजारे (अध्यक्ष – राष्ट्रवादी युवक ओ.बी.सी. सेल – कर्जत ) , सोमनाथ पालकर (अध्यक्ष – राष्ट्रवादी युवक कर्जत शहर ) , सागर जोशी (अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक माथेरान -शहर ) , शाहनवाज पानसरे ,अरुण ऐणकर , ऋषी दाभाडे , जय बोराडे , तेजस भासे , रुपेश कोंडे , अप्पूराज गायकवाड , प्रवीण ठाकरे , चेतन ठाणगे , ऋषी राणे , अतुल कडू , तुषार देशमुख , महेंद्र ठोंबरे , विशाल भवारे , किशोर सावंत , भाऊ लदगे , योगेश कांबरी, संभाजी लदगे , ज्ञानेश्वर लदगे , विलास लदगे , किरण बडेकर , योगेश थोरवे ,सालिक तांबोळी , तुषार देशमुख ,अक्षय जाधव , श्याम पाटील ,आकाश शेळके , सुदेश हजारे योगेश गंगावणे , अक्षय भोईर , सुशांत बोराडे , समीर मसने ,रोहन चव्हाण ,जितू करताडे , काका ढाकवळ ,सुरज शेळके ,आदी राष्ट्रवादी युवक व विध्यार्थी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डिलीट पदवी प्रदान करण्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जीभ घसरून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री गडकरींशी करून छत्रपतींचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला , हे निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे , असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तानाजी चव्हाण यांनी आपले सडेतोड विचार मांडून राज्यपाल व भाजपाचे त्रिवेदी यांनी ही आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांचाही जाहीर निषेध केला.
तर कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहर कार्याध्यक्ष राजेश दादा लाड यांनी संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे उदगार काढून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा हे राज्यपाल यांचे कृत्य अशोभनीय आहे , या राज्याचे राज्यपाल इतक्या मोठ्या संविधानिक पदावरती बसणा-या व्यक्तीने राज्याचे हित जोपासायचे , राज्याला प्रगतीपथावर न्यायचे , ते सोडून प्रत्येक वेळेस राज्यपाल या पदास गालबोट लावणारे , व येथील जनतेच्या मनात संताप निर्माण करण्याच्या राज्यपालांच्या वक्तव्यांचा जनता जाहीर निषेध करते , तरीही महापुरुषांच्या विरोधात जाणूनबुजून बोलणे , महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींचा अवमान करणे व येथील वातावरण खराब करणे हे आम्ही कदापि सहन करणार नाही.
असे संतापजनक मत व्यक्त करून राज्यपालांचा जाहीर निषेध नोंदविला.तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कर्जत ता.युवा अध्यक्ष सागर भाऊ शेळके यांनी देखील छत्रपतींना अपमानित वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा जाहीर निषेध करून त्यांना या पदावरून हकालपट्टी करा , अशी जोरदार मागणी करत , भाजपाचे त्रिवेदी यांचा ही निषेध नोंदविला .यावेळी छत्रपतींच्या ” जयघोषाने ” चारफाटा दुमदुमला , तर राज्यपाल यांच करायचं काय , खाली डोकं वर पाय , अश्या संतापजनक घोषणा ही देण्यात आल्या.