भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे )कर्जत-खालापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरीत होऊन कर्जत तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी या ग्रामपंचायत हद्दीतील मौजे एकनाथ वाडी ( भिकारवाडी ) येथील अनेकांनी रायगडचे खासदार व राजकीय क्षेत्रातील द्रोणाचार्य,कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली व राजिप चे उपाध्यक्ष तथा शिक्षण-आरोग्य व क्रिडा सभापती सुधाकरशेठ घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पुजा रिसॉर्ट नेरळ येथील सभागृहात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला.
कर्जत तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येथे रायगडचे राजकीय भीष्मांचार्य तथा कोकणचे भाग्यविधाते खासदार सुनीलजी तटकरे यांचे विशेष लक्ष असते. त्यांच्या नेतृत्वाखाली येथील सर्वेसर्वा सुरेशभाऊ लाड यांनी तीन वेळा आमदार होऊन नेतृत्व केले आहे.ग्रामीण भागात विकासाच्या जोरावर त्यांचा करिष्मा आजही टिकून आहे. त्यातच राजिपचे उपाध्यक्ष तथा शिक्षण-आरोग्य व क्रिडा सभापती सुधाकरशेठ घारे यांच्या विकास कामांच्या झंझावाताने तालुक्यात तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आकर्षण आहे.
कर्जत तालुका अध्यक्ष भगवान शेठ चंचे हे जेंव्हा पासून कर्जत तालुका अध्यक्ष झाले तेंव्हापासून त्यांचे तालुक्यात असलेले एक वेगळ्याच व्यक्तित्वामुळे तरुणांना ” आपला माणूस ” म्हणून भगवानशेठ चंचे , वाटत असल्याने भागातील विकासकामे , समस्या ,दैनंदिन जीवनात येणारे अडीअडचणी या सोडविण्याचा आजपर्यंत ते प्रयत्न करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तरुणाईचा लोंढा पक्ष प्रवेश करत आहेत.
म्हणूनच आज कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सालोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे एकनाथवाडी (भिकारवाडी) येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी रायगडचे खासदार तथा कोकणचे भाग्यविधाते मा.सुनीलजी तटकरे साहेब ,जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार मा .श्री सुरेशभाऊ लाड व राजिप उपाध्यक्ष तथा शिक्षण-आरोग्य व क्रिडा सभापती मा.सुधाकरशेठ घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या कार्यक्रमाला कर्जत तालुका अध्यक्ष भगवान शेठ चंचे , जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण ,कर्जत नगरपरिषदेचे गटनेते शरदभाऊ लाड ,तालुका अध्यक्षा रंजनाताई धुळे त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.