Friday, December 8, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने " सेल्फी विथ गौरी गणपती स्पर्धा...

कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ” सेल्फी विथ गौरी गणपती स्पर्धा २०२३ ” चे आयोजन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांना आपल्यात दडलेले ” सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ” व चूल आणि मूल या बंधनाच्या जोखडातून उंबरठा ओलांडून स्वबळावर सामर्थ्यवान बनविण्याच्या हेतूने कर्जत तालुक्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार व रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण नेतृत्व महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे तसेच आमदार अनिकेत दादा तटकरे व कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट नेतृत्व राजिपचे मा. उपाध्यक्ष तथा आरोग्य – क्रिडा – शिक्षण सभापती सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी व बचत गटांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी गणेशोत्सवात कर्जत तालुका स्तरीय ” गौरी गणपती आरास स्पर्धा – २०२३ ” कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेत ” पैठणी ” बक्षिस रुपी वितरण करण्यात येणार आहेत.

कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेसच्या वतीने ” सेल्फी विथ गौरी गणपती स्पर्धा २०२३ ” चे आयोजन केले असून यांत ” गौरी गणपती आरास ” सोबत फोटो घेऊन ३ मिनिटाचा विडिओ मध्ये १) अंधश्रद्धा निर्मूलन २) मुलीच्या जन्माचे स्वागत ३) हुंडा बळी , असे विषय ठेवण्यात आले आहेत . ईत्यादी विषयावर व्हीडिओ बनवून या 9881924998 नंबर वर दि. २४ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवायचा आहे.

या स्पर्धेत तालुक्यातून ३ नंबर निवडले जातील , प्रत्येक विजयी स्पर्धकाना पारितोषिक प्रथम क्रमांक – पैठणी , द्वितीय क्रमांक – पैठणी , तृतीय क्रमांक – पैठणी दिले जातील. तरी सर्व महिलांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा , अशी विनंती व आवाहन ऍड. रंजना धुळे , अध्यक्षा – राष्ट्रवादी महिला काँग्रेस, कर्जत तालुका यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page