Monday, March 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करा , खासदार आप्पासाहेब बारणे यांना कर्जतकरांचा...

कर्जत रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करा , खासदार आप्पासाहेब बारणे यांना कर्जतकरांचा टाहो !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कोरोना महामारीत रद्द झालेल्या गाड्या व कर्जत रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या थांबत नसल्याने कर्जतकर रेल्वे प्रवासी वर्गाला याचा अतोनात त्रास होत आहे .या गंभीर बाबीकडे मावळ मतदार संघाचे सत्ताधारी पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे अद्यापी लक्ष कसे वेधले नाही , असा संतापजनक सवाल आता नागरिक करू लागले असून १० वर्षांत सात वेळा ” संसद रत्न ” पुरस्कार प्राप्त खासदार श्रीरंग उर्फ आप्पासाहेब बारणे संसदेत हा प्रश्न का उपस्थित करत नाहीत , असा टाहो आता कर्जतकर रेल्वे प्रवासी व नागरिक करताना दिसत आहेत .कर्जत रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या पुण्यावरून येताना पूर्वी थांबा होता , मात्र कोरोना काळापासून अनेक गाड्या कर्जत येथे न थांबता थेट कल्याण येथे थांबवतात , तर अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.
ज्या गरिबांच्या रेल्वे गाड्या होत्या , त्यात प्रवास करणे , आम नागरिकांना सोयीस्कर व परवडणारे होते , मात्र या गाडया बंद झाल्याने दुसऱ्या वेळेवर गाड्या नसतात तर इतर गाड्यांत प्रवास करणे , महागाचे झाले आहे . हि बाब कोरोना काळ संपून २ वर्षे होऊनही वृत्तपत्रातून व नागरिकांनी केलेला पत्रव्यवहार वरून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कानावर हि बाब गेली नसेल का ? असा सवाल आता रेल्वे कर्जतकर प्रवासी वर्ग करताना दिसत आहेत . ज्या खासदार बारणेनी संसदेत नागरिकांचे अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित करून १० वर्षात ७ वेळा ” संसद रत्न ” पुरस्कार प्राप्त केला , ते खासदार श्रीरंग बारणे रेल्वे गाड्या बंद झाल्या आहेत व अनेकांना कर्जत स्थानकावर फास्ट गाडी सोडताना झालेले अपघात , याची खबर असताना संसदेत याचा प्रश्न का उपस्थित करत नाहीत , या प्रश्नावर आता शहरात चर्चा होऊ लागली असून , अजून ” संसद रत्न ” खासदार गप्प का ? असा संतापजनक सवाल आता कर्जतकर करताना दिसत आहेत.

कोरोना काळात कर्जत स्थानकावरील गाड्या ह्या केंद्र सरकारने बंद केल्या होत्या , असे रेल्वे प्रशासनाने म्हणणे आहे , तर अनेक गाड्यांचे कर्जत रेल्वे स्थानकावर थांबा बंद केला आहे , यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करणे गरजेचे आहे , म्हणूनच कर्जतकर नागरिक , रेल्वे प्रवासी , छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटना , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्वांच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना या बातमीद्वारे आवाहन करण्यात येते की , हि नागरिकांची गंभीर समस्या त्वरित सोडविण्यासाठी पाऊल उचलावे , व बंद झालेल्या गाड्या , बंद केलेले थांबे , त्वरित सुरू करावेत अशी संतप्त जोरदार मागणी येथे जोर धरू लागली आहे.

You cannot copy content of this page