कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी..

0
207
भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत दि . २१ जानेवारी २०२२ रोजी, कर्जत रेल्वे पोलीस ठाणेत गु.र.नं ४७/२०२१ कलम ३७९ भा.द.वि अन्वये, फिर्यादी ऋतुजा प्रशांत शिंदे, वय ४१ वर्ष, व्यवसाय – नोकरी, राह . रूम नं. १४, कचरनाथ सेवा मंडळ, गणेश मंदिर मार्ग, वडाळा, मंदिर, मुंबई यांनी चोरीची तक्रार दाखल केली होती, नमुद गुन्ह्याचा अल्पावधीत तपास करून चोरीस गेलेली मालमत्ता जप्त करून.
गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन फिर्यादी यांना परत करण्यात आल्याने फिर्यादीस दिलासा मिळाला असून त्यांनी कर्जत रेल्वे पोलीस ठाणाच्या जवानांचे आभार प्रकट केले.यावेळी २,२००/- रुपये रोख भारतीय चलनी नोटा त्यामध्ये ५०० च्या ४, १०० च्या २ दराच्या नोटा, २) ००/- रुपये किमतीचे रेल्वेचे तिकीट, एकुण २.२००/- रु, याकामी पोहवा ३३१६ ज्ञानेश्वर पाटील, पोशि ११३७ समिर पठाण मुद्देमाल अमलदार यांनी वपोनि, संभाजी यादव – कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली फिर्यादी यांचा पाठपुरावा करून सदर मुद्देमालाची निर्गती केली आहे.
नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल विनाविलंब परत मिळालेबद्दल, फिर्यादी यांनी सदर कामगिरी बाबत नमूद रेल्वे पोलिसांचे आभार मानले.तर संभाजी यादव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक – कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी रेल्वे पोलीस जवानांचे कौतुक केले.