Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे पोलीस व होमगार्ड यंत्रणेच्या सतर्क कार्यामुळे भाग्यश्री दाभाडे या युवतीचे...

कर्जत रेल्वे पोलीस व होमगार्ड यंत्रणेच्या सतर्क कार्यामुळे भाग्यश्री दाभाडे या युवतीचे वाचले प्राण !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) अस म्हणतात की , ” देव तारी त्याला कोण मारी ” ! मात्र हे रूप आपणास वेळेला मदतीला धावणाऱ्या कुणाच्याही देहरूपी दिसतो , या उक्तीप्रमाणे बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीचे ९ वाजता पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे मेल पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या भाग्यश्री दाभाडे , मु . ( करमाळा ) या युवतीला कर्जत स्थानक आल्यावर या स्थानकावर गाडी थांबत नसल्याने गाडी थोडी स्लो झाल्यावर अचानक गाडी सोडावी असे वाटल्यावर तिने गाडी सोडली , मात्र रेल्वे गाडीच्या स्पीडचा अंदाज न आल्याने तिने सोडलेल्या गाडीने त्या भरकटल्या व गाडीच्या खाली आल्या , त्यामुळे त्यांच्या हातावरून गाडी गेल्याचे व डोक्याला मार लागल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.
हि खबर कर्जत रेल्वे स्थानकावर पोलीस यंत्रणेला समजताच तातडीने येथे कर्तव्यावर असणारे रेल्वे पोलीस कर्मचारी पो .ना.घोलप मॅडम , होमगार्ड – २४०९ अंजुम कदम , होमगार्ड ४८१९ – भरत लोहकरे , होमगार्ड ४७८८ केतन लोखंडे , होमगार्ड ४७२६ – रोशन बुरुड , होमगार्ड ४७२३ – दशरथ जाधव व होमगार्ड प्रेरणा सचिन भालेराव यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या युवतीस तातडीने धावत – पळत स्ट्रेचरवर ठेवून कर्जत बाजारपेठेतून तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यामध्ये कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.रामदास तडपेवार , किरण किटे – कक्षसेवक , बळीराम दळवी – सुरक्षारक्षक , वैशाली वाघ – स्टाफ नर्स , औटे – सिस्टर यांनी तातडीने त्या भाग्यश्री दाभाडे या युवतीस वाचविण्यासाठी उपचार सुरू करून शर्थीचे प्रयत्न केले , व त्या युवतीचे प्राण वाचवले .तिच्यावर प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले.याकामी शिवसेनेचे कर्जत शहर संघटक नदीमभाई खान व पालिकेचे कर्मचारी बंटी सोनावणे यांनी देखील तातडीने उपचार करणे कामी मोलाचे सहकार्य केले .

You cannot copy content of this page