Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे ब्रिजवरील झाडी झुडपे हटवा ,सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेनेचा निर्णायक ईशारा...

कर्जत रेल्वे ब्रिजवरील झाडी झुडपे हटवा ,सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेनेचा निर्णायक ईशारा !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला आलेली मरगळ घालविण्यासाठी व कुठे – कुठे अपघात होऊ शकतात , यासाठी नागरिकांची सुरक्षा जपणे हा , मुख्य भाग म्हणून कर्जत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता वानखेडे यांना निवेदन देऊन कर्जत शहरातील रस्त्याबाबतच्या समस्यांचा पाढा वाचून या समस्या त्वरित न हटविल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा कर्जत शिवसेना शहर प्रमुख निलेश घरत यांनी दिला.
आज दिनांक ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी कर्जत शहर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत कार्यालयात जाऊन कर्जत शहरातील समस्या बाबत निवेदन देण्यात आले.कर्जत रेल्वे ब्रिज वरील अस्ताव्यस्त रस्त्याच्या कडेला झाडी वाढली आहे . शासन पाच आकडी पगार देऊन ज्यांना या खुर्चीत काम करण्यास बसवले आहे , त्या कार्यकारी उपअभियंता वानखेडे यांना हे दिसत नसल्याने त्यांची कान उघडणी आज कर्जत शिवसेना शहर प्रमुख निलेश घरत यांनी आपले पदाधिकारी व शिवसैनिक घेऊन केली . यावेळी कर्जत रेल्वे ब्रिज वरील झाडी – झुडपे व फुटपात मोकळा करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावर कार्यकारी उपअभियंता वानखडे यांनी सदर ब्रिजवरील झाडी – झुडपे जे वाहतुकीस बाधित व अपघातास कारणीभूत आहेत ते फुटपाथ दोन दिवसात मोकळे करून देण्याचे आदेश अधिकारी वर्गास दिले . त्यामुळे तेथून पायी येणाऱ्या – जाणाऱ्या व सकाळी फिरणाऱ्या नागरिकांची अडचण दूर होईल ,व वाहतुकीस बाधा येणार नाही , तसेच दहिवली – आकुरले यामधील बरीच वर्षे नादुरुस्त असलेला रस्ता आठ दिवसात काम सुरू करून देण्याचे आश्वासनही वानखडे यांनी दिले.

सदरच्या कान उघडणी आंदोलनात कर्जत शिवसेना शहर प्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) निलेश बाळू घरत , शहर संघटक मुकेश राजाराम पाटील , युवा सेना अधिकारी कर्जत शहर गौरव चंद्रकांत भानुसघरे , कर्जत उपशहर प्रमुख विनोद पांडे , उपशहर प्रमुख प्रमोद नाना खराडे , उप शहर अधिकारी प्रितेश बोंबे , शाखाप्रमुख मयूर मोरे , विभाग प्रमुख अमित गुप्ता , विभाग प्रमुख मुद्रे योगेश दिघे , शाखाप्रमुख मुद्रे तुषार बडेकर , उपविभाग संघटक मुद्रे सतीश कोकणे , उपशाखा अधिकारी मुद्रे करण तळेगावकर , सामाजिक कार्यकर्ते जयवंत म्हसे , व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page