if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
ऑल इंडिया एस. सी. एस. टी. रेल्वे एम्प्लॉइज असो. कर्जत – नेरळ शाखेचा पुढाकार !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारत देश हा ” स्वातंत्र्य – समता – न्याय – बंधुता – अखंडता ” या आधारावर असून त्याची निर्मिती ” महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस , दिवस – रात्र मेहनत ” भारतीय संविधान ” तयार केली व देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अर्पण केले , म्हणून या दिनाला ” संविधान दिन ” म्हणून संबोधित केले जाते . यावर्षी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ” अमृत महोत्सवी ” वर्षे असून संविधान दिनाला ” ७५ वर्षे ” पूर्ण होत आहेत. या दिनाचे औचित्य साधून कर्जतमध्ये मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ” संविधान दिन ” ऑल इंडिया एस. सी. एस. टी. रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन कर्जत – नेरळ शाखेचे वतीने प्लेटफार्म नंबर १ वर असलेल्या महामानव – बोधिसत्व – संविधान निर्माते , डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले .
यावेळी कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक मा. प्रभास लाल साहेब , रेल सुरक्षा बल ( RPF ) चे अधिक्षक श्री. चौगुले साहेब , लोहमार्ग पोलीस निरीक्षक श्री तानाजी खाडे साहेब , ऑल इंडिया एस सी /एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोशिएशन कर्जत – नेरळ शाखेचे अध्यक्ष आयु. अशोक आल्हाट , ऑपेरेटिंग विभाग , कामर्शियल विभाग, इलेक्ट्रिक विभाग कर्मचारी , रेल्वे पेन्शनर संघटनेचे आयु. सुनील चव्हान , बी एच गायकवाड , तिकीट तपासनीस दौलत ब्राह्मणे , बडेकर तसेच घाट लोको पायलट श्री शैलेंद्र कुमार यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली .
यावेळी हरीश खंडेलवाल – खोपोली , साईनाथ मुरबे – देवपाडा – नेरळ , S & T विभाग , O H E विभाग व इंजिनियरिंग विभाग कर्मचारी वर्गाने याप्रसंगी मोलाचे सहकार्य केले व ” भारतीय संविधान दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला.