Monday, December 4, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत शहरातील समस्यांचा बाळासाहेबांची शिवसेनेने वाचला पाढा !

कर्जत शहरातील समस्यांचा बाळासाहेबांची शिवसेनेने वाचला पाढा !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) एकीकडे कर्जत नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ” स्वच्छ शहर – सुंदर शहर ” याबाबत राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार मिळालेला असताना शहराच्या आत डोकावल्यास शहरात मात्र काही वेगळेच चित्र पालिकेच्या प्रशासन वर्गाने करून ठेवले आहे . कर्जत शहरातील समस्यांचा पाढा नागरीकांनी दिल्यावर ” बाळासाहेबांची शिवसेना ” या पक्षाचे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी आज आपले पदाधिकारी व शिवसैनिकांना घेऊन कर्जत नगर परिषदेवर क्रोध मोर्चा काढून मुख्याधिकारी गारवे यांना जाब विचारला , तर या समस्यांवर त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल , असा ईशारा देण्यात आला.
यावेळी दहिवली परिसरामध्ये पाण्याच्या वेळेमध्ये अनियमितता असल्याचे दिसून येते , तसेच येणारे पाणी गढूळ असल्याचे समजते तरी सदर येणाऱ्या पाण्याची वेळ निश्चित करण्यात यावी.२) कर्जत शहरामध्ये केरकचरा ही फार मोठ्या मोठी समस्या आहे.
शहरांमधील उल्हास नदीवरील लहान पूल व मोठ्या पुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येतो तसेच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे सदरच्या कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास रोगराई नष्ट होण्यास मदत होईल . ३) दहिवली परिसरातील घाटावर शेड बांधणे आवश्यक आहे तसेच तेथील स्वच्छता देखील अत्यंत गरजेची आहे . ४) कर्जत शहरातील स्मशानभूमी मध्ये नागरिकांना बसण्याची काही सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे , मागील दोन ते तीन वर्षापासून स्मशानभूमीचे काम मंजूर व अर्धवट स्थितीत आहे ते काम कधी पूर्ण होणार ? याच्या प्रतीक्षेत पूर्ण कर्जतकर आहेत.
५) कर्जत शहरांमधील सार्वजनिक शौचालयांना देखभाल व दुरुस्तीची गरज असल्याचे समजते तरी सदरील सार्वजनिक शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी . ६) कर्जत शहरातील अनेक ठिकाणी जुनी व जीर्ण गटारी आहेत , त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे तरी सदरील सर्व गटारांची त्वरित साफसफाई करण्यात यावी. ७) आमराई येथे घरोघरी नळ पाणीपुरवठा योजनेची व्यवस्था आहे , परंतु पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये प्रेशर नसल्याकारणाने सुरळीत रित्या पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे आमराई येथील सर्व रहिवासी पाणी आणण्याकरता स्मशानभूमी येथे जवळ असलेल्या नळाचा वापर करतात तरी यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी.
८) मुद्रे गुरुनगर परिसरामध्ये गटारांची अवस्था अत्यंत दयनीय असून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था अजिबात दिसून येत नाही , तरी गटारांची दुरुस्ती करून गटारांवर त्वरित झाकणे बसविण्यात यावी. ९) दहिवली गुरव आळी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवाशांकरिता सार्वजनिक शौचालय उपलब्ध आहेत परंतु सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था नाही शौचालय अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये असून स्लॅब पडायला आला आहे व शौचालयास दरवाजे सुद्धा नाहीत , गुरव आळी – कोकण आळी व दहिवलीतील इतर परिसरातील गटारांवर झाकणे नसल्याकारणाने विषाणूंचा व डासांचा प्रादुर्भाव होतो व रोगराई वाढते. १०) डेक्कन जिमखाना परिसरामध्ये हॉटेल दत्तात्रेय समोर रस्त्याच्या बाजूस नेहमी कचऱ्याचा ढीग असतो, सदरील कचरा नगरपरिषद प्रशासनामार्फत उचलला जात नाही तेथील पिंपळाच्या झाडाजवळ रस्त्याचा बाजूस संरक्षण भिंत नसल्याकारणाने अनेकदा अपघात होत असल्याचे समजते तरी यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी.
११) भिसेगाव फातिमा नगर येथे जवळपास ५०० नागरिकांची लोकवस्ती आहे , परंतु अद्याप पर्यंत फातिमानगर येथे सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही व अंतर्गत रस्ते गटारे यांची सुविधा नाही. १२) भिसेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिरापासून ते गोसावी यांच्या घरापर्यंत असणाऱ्या गटारांची दुरुस्ती करून त्यावर त्वरित झाकणे टाकण्यात यावीत. १३) भिसेगाव राधे गॅलेक्सी येथे नगरपरिषदेची जागा आरक्षित असून या जागेस भिसेगाव व त्या परिसरातील रहिवाशांकरीता त्वरित उद्यान तयार करण्यात यावे.१४) आमराई परिसर कर्जत येथे नाट्यगृह उपलब्ध आहे , परंतु नाट्यगृहाचे उदघाटन अद्यापही झाले नाही व त्यात सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. १५) सर्व प्रभागात निर्जंतुकीकरण फवारणी होणे आवश्यक आहे परंतु ती कधीही झाल्याचे दिसून येत नाही. १६) कर्जत शहरात अनेक जुने वृक्ष आहेत परंतु विविध बांधकामे करण्यासाठी वृक्षांची कत्तल न करता त्याला आधुनिक तंत्राद्वारे सुरक्षित जागेवर स्थलांतरित करावे अथवा योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.
१७) कर्जत येथे नगरपरिषदेमार्फत अनेक चौकांचे सुशोभीकरण केले आहे परंतु सदरील चौकांची सद्यस्थिती योग्य नाही , त्यांची निगा राखली जात नाही.याबाबतचे निवेदन ” बाळासाहेबांची शिवसेना ” चे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी गारवे मात्र अनुपस्थित होते , म्हणून कार्यालयीन प्रमुख गोसावी यांच्याशी संतप्त चर्चा केली .
- Advertisment -

You cannot copy content of this page