Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कर्तृत्ववान मुख्यमंत्री व कार्यसम्राट आमदार " लाभणे हे या मतदार संघाचे...

” कर्तृत्ववान मुख्यमंत्री व कार्यसम्राट आमदार ” लाभणे हे या मतदार संघाचे भाग्य…

छतीशी विभागातील ” वडवळ ” येथील ठाकरे गटातील अनेकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” नेतृत्वावर व कर्तुत्वावर ” विश्वास ठेवत प्रत्येक प्रभागातून शिवसेना पक्षात इनकमिंग सुरू आहे . विकासाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागाचा कायापालट करणारे व आपल्या मतदार संघात विकास निधीसाठी प्रसंगी शाब्दिक दोन हात करणारा आमदार , कुठे शोधून सापडणारा नाही , त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला भर टाकणारा या स्वभावामुळे ” हेच का विकास पुरुष ” म्हणून सर्व पक्षीय पदाधिकारी – सदस्य कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत.

गेली ४० वर्षे जे काम होत नव्हते ते ” कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे ” काम मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत चर्चा करून त्यांच्या आजवरच्या समस्या सोडविण्याचे व त्यांच्या परिसरातील विकास साधण्याच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याचे धैर्य त्यांनी दाखविले , या त्यांच्या झटपट निर्णय घेण्याच्या कार्य कर्तुत्वावर छत्तिषी विभाग कोयनाग्रस्त वडवळ प्रभाग येथील ज्यांना ” त्रिमूर्ती ” म्हणून ओळखले जाते , अशी राजकीय ताकद असलेले वडवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री जितेंद्र विष्णू सकपाळ , युवा सेना अधिकारी ( उबाठा ) , श्री संतोषजी सकपाळ , उपतालुकाप्रमुख ( उबाठा ) श्री अशोक मरागजे यांनी व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले . हा पक्ष प्रवेश सोहळा रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी ” बाळासाहेब भवन ” जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे सायं . ६ – ०० वाजता पार पडला.

यावेळी शंकर शिंदे , पांडुरंग शिंदे , प्रकाश सपकाळ , सुनील सकपाळ , संकेत जाधव , नामदेव सकपाळ , दिनेश सकपाळ , संतोष सकपाळ , केशव सकपाळ , विजय सकपाळ , बजरंग मरागजे , रवींद्र मरागजे , लोकेश सकपाळ , प्रसाद शिंदे , वैष्णव सावंत , सुनील सावंत , विपुल सकपाळ , आनंद सकपाळ तसेच खोपोली येथील उमेश गायकवाड , प्रमोद भांबळे , सचिन केदार , प्रसाद पंडित यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , माझ्या विनंतीला मान देवून तुम्ही जो पक्ष प्रवेश केला आहे, शिवसेना पक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे . शिवसेना पक्षामध्ये नवा – जुना शिवसैनिक असा कोणताही भेदभाव नसतो , येथे विकास कार्याला महत्त्व दिले जाते . जी व्यक्ती चांगले काम करते तिला नेहमीच पक्षात मानसन्मान दिला जातो .
आपण आज पक्षात प्रवेश करत आहात , आपल्याला योग्य तो ” मानसन्मान ” दिला जाईल , तसेच कोयना प्रकल्पात असणाऱ्या २२ गावांचा योग्य तो विकास केला जाईल , तुमच्या समस्या सोडविल्या जातील व त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्याला योग्य त्या सेवा सुविधा दिल्या जातील , यासाठी १५० करोड रू. चे प्रस्ताव तयार होवून मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले , तर १ सप्टेंबर २०२४ रोजी भव्य दिव्य ” न भूतो – न भविष्यती ” असा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम , ५ सप्टेंबर ” शिक्षक दिन ” सोहळा शिवतीर्थ – पोसरी येथे होणार असून कर्जतमध्ये ” भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ” भूमिपूजन सोहळा मा. खासदार श्रीकांत शिंदे साहेब , रायगडचे आमदार भरत शेठ गोगावले , महेंद्र दळवी व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवतीर्थ पोसरी येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पक्ष प्रवेश सोहळा प्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , संपर्क प्रमुख विजय पाटील , कर्जत ता. प्रमुख संभाजी जगताप , खालापूर प्रमुख संदेश पाटील , विधानसभा अध्यक्ष प्रसाद दादा थोरवे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , सनी चव्हाण , शशी मोरे , संध्या जाधव – कर्जत विधानसभा संघटिका , सिनकर , सुवर्णा शिंदे – वडगाव विभाग संघटक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विकास निधी आणण्यासाठी दोन हात करणारा कार्यसम्राट आमदार , असे गौरोदगार पक्ष प्रवेशकर्ते यांनी करून आगामी काळात वडवल मध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश सोहळा होणार असून आजचा प्रवेश ” श्री पांडुरंगाच्या ” समोर त्यांच्या साक्षीने झाला आहे , येणाऱ्या निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळवून देवून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना निवडून आणून आमदार करणार , असे मत सर्वांनी व्यक्त केले . यावेळी संपर्क प्रमुख विजय पाटील, शशी मोरे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page