काका ‘ स फिटनेस सेंटरचा बबन झोरे ठरला देशात अव्वल !

0
62

STRONG MAN OF INDIA या पुरस्काराचा मानकरी..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत तालुका – रायगड जिल्हा – मुंबई – राज्यस्तरीय – देशातील अनेक राज्यात अव्वल ठरलेला काका ‘स फिटनेस सेंटर कर्जत मधील अष्टपैलू खेळाडू बबन बाबू झोरे देशात अव्वल ठरला असून ” STRONG MAN OF INDIA ” या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.त्यामुळे अष्टपैलू बबन झोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.बबन बाबू झोरे यांच्या नावावर आतापर्यंत सर्व स्तरातील अव्वल दर्जाची रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक मिळाले आहेत.

दिसायला साधा – सरळ व कमी उंचीचा असलेला बबन स्पर्धेत उतरल्यावर एव्हढा मोठा पराक्रम करेल , हे स्पर्धेतील इतरांना वाटत देखील नाही , मात्र एक वेगळीच जिद्द- चिकाटी व जिंकण्याची ऊर्जा त्याच्यात असल्याने यावेळी सलग पाच दिवस तेलंगणा ( हैद्राबाद ) येथे भारत सरकारच्या नॅशनल लेव्हल २०२१ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १८ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेशात सुरू असलेल्या लढतीत कर्जत तालुक्यातील काका ‘ स फिटनेस मधील अष्टपैलू ” महाराष्ट्राचा वाघ – बबन ” हा महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना एकूण ४९० किलो वजन उचलून ” गोल्ड मेडल ” आणि या संपुर्ण स्पर्धेतील सर्वांत मोठा पुरस्कार तो फ़क्त एकच खेळाडूला दिला जातो तो म्हणजे ” STRONG MAN OF INDIA ” हा सुद्धा आपल्या नावावर त्याने कोरला.

या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे काका’स फिटनेस सेंटर कर्जतचे सर्वेसर्वा बंटीशेट तथा मयूर जोशी , नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी यांनी त्यांच्या या रेकॉर्डब्रेक कामगिरी बद्दल खूप खूप अभिनंदन करून पुढील वर्ल्ड एशियन स्पर्धेसाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या . माझ्या या यशात काका ‘ स फिटनेसचे सर्वेसर्वा मयूरशेट जोशी , फिटनेस सेंटरचे व्यवस्थापक अमित गुप्ता , प्रशिक्षक , कर्जत – खालापूर तालुक्यातील माझे मित्र परिवार , माझे कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या सहकार्याने व प्रेरणेमुळेच मी देशात अव्वल ठरलो , असे मत पुढील होणारा ” जगज्जेता बबन बाबू झोरे ” यांनी व्यक्त केले.