कातकरी आदिवासी लोकांचे स्थलांतर रोखण्यासाठी संपर्क ईक्लेर्स प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचा रोजगार वाटप !

0
117

मुळशी, मावळ, वेल्हा, भोर येथील 100 कुटुंबांना रोजगार वाटप…

मुळशी, मावळ, वेल्हा, भोर येथील वेगवेगळ्या कातकरी आदिवासी वस्तीवर ‘संपर्क ईक्लेर्स प्रकल्पाच्या अंतर्गत’ रोजगार वाटप करण्यात आले. यामध्ये एकूण 100 कुटुंबांना संस्थेच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला या रोजगारामध्ये शिलाई मशीन, मासे जाळी, वेल्डिंग साहित्य, बांधकाम साहित्य,गवत कंपनी यंत्र,इलेक्ट्रिकल साहित्य,पीठ गिरणी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. ‘संपर्क’ संस्था आठ वर्षापासून आदिवासी कातकरी लोकांचे स्थलांतर रोखण्यासाठी काम करत आहे.

कातकरी आदिवासी लोकांचे स्थलांतर थांबावे व त्यांनी या रोजगाराच्या माध्यमातून सक्षम होऊन आदिवासी मुले शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होवी यासाठी संस्था काम करते.
संपर्क संस्थेने या आधी कातकरी आदिवासी लोकांची प्रगती व्हावी यासाठी कातकरी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप देखील केले आहे.

यासोबत आदिवासी विद्यार्थी निवासी संपर्क शाळा भांबर्डे येथे देखील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच 12 वीच्या पुढील विद्यार्थ्यांची एडमिशन फी भरणे ही संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतलेली आहे. ईक्लेर्स प्रकल्पाच्या माध्यमातून मुळशी, मावळ, वेल्हा, भोर येथील 100 कुटुंबांना रोजगार वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी साहेब,मुख्यकार्यकारी अधिकारी अनुज कुमार सिंग ,प्रकल्प मॅनेजर निलेश कदम सर ,संपर्क शाळा भांबर्डे मुख्यध्यापक श्री चालक सर ,प्रकल्प समन्वयक रोकडे कल्पेश ,संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गँगणे,यादव रतन,सूयेश मेहंदळे ,निखिल पवार, गजिले परमेशवर, कपिल स्वामी,चंद्रकांत डोंगरे, सोपान कुंभार उपस्थित होते.