कातकरी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळागळात पोहचणे गरजेचे.. जनसेवक किरण राक्षे

0
307

कातकरी वस्तीवर मुक्काम करत त्यांना काढून दिले इ – श्रम कार्ड मोफत…

पवनानगर :पवन मावळ या परिसरामध्ये अनेक वाड्या वस्त्यांमध्ये कातकरी समाज मोठ्या प्रमाणात राहत आहेत. याच परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री किरण राक्षे यांनी कातकरी पाड्यांवर मुक्काम करत तेथील बांधवाना इ श्रम कार्ड 120 कातकरी बांधवांना जातीचे दाखले काढून देण्यात आले.

या उपक्रमात चावसर येथील कौटम वाडीवरील 50 कातकरी माता भगिनींना व बांधवाना इ श्रम कार्ड, युनिव्हर्सल पास तसेच 120 कातकरी बांधवाना जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यात आले.

या इ श्रम कार्ड योजने अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील मिळतो. विशेष म्हणजे विम्यासाठी प्रीमियम भरण्याची गरज नाही. याअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख आणि अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचे अनुदान मिळते अशी माहिती या वेळी किरण राक्षे यांनी कातकरी बांधवाना पटवून दिली .

या संदर्भात किरण राक्षे म्हणाले या कातकरी बांधवांच्या वाडीवर मुक्काम केल्या मुळे मला येथील समस्या समजून घेण्यासाठी मदत झाली या पूर्वी देखील कातकरी बांधवाना जातीचे दाखले काढून देण्यात आले आहेत. या सर्वांचे आशिर्वाद घेऊनच, यांच्यातील एक बांधव म्हणुन सर्व योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे .

या वेळी येथील कातकरी बांधव भावनिक होऊन म्हणाले आमच्या साठी या ठिकाणी मुक्काम केला व आमच्या बांधवांच्या मदती साठी तुम्ही पुढे आलात याचा आम्हाला खूप अभिमान वाटला हे सांगत किरण राक्षे यांचा त्यांनी सत्कार करून आभार मानले.

या ठिकाणी त्यांच्या समवेत बाळासाहेब खांडभोर, आदिवासी नेते सिताराम पवार,भाजपा अध्यक्ष दत्ता गोणते, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष दिलीप गोणते ,भाजपा विद्यार्थी आघाडी सरचिटणीस निलेश कडु ,आदिवासी आघाडी प्रमुख संतोष जाधव, उप सरपंच चावसर कांताबाई पवार ,उद्योजक रामदास मेने,लहू आखाडे , रामदास आखाडे,अनिल वाघमारे ,आदि मान्यवर व कर्यकर्ते उपस्थित होते.