Sunday, December 8, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदमय वातावरणात व जल्लोषात संपन्न...

कामशेत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदमय वातावरणात व जल्लोषात संपन्न…

कामशेत (प्रतिनिधी):कामशेत शहर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मोहत्सव उत्सहात संपन्न झाला. या संयुक्त जयंती मोहत्सवाचे आयोजन विद्यमान सरपंच रुपेश (बंटी) अरुण गायकवाड यांच्या संकल्पनेतून तसेच एस आर पी चे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे व मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी, कामशेत शहरच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त तब्बल सहा दिवस विविध सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम अशा भव्य दिव्य जयंती सोहळा काल दि.19 रोजी संपन्न झाला.
सहा दिवस चालणाऱ्या जयंती सोहळ्यासाठी कामशेत शहर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच व्यापारी संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले. या जयंती महोत्सवाच्या अंतिम दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात, बँड बाजाच्या सुरात व डी जे च्या धुमधडाख्यात मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूकिनंतर जाहीर सभा व त्यानंतर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सुनील शेळके, एस आर पी राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, दिपक हुलावळे यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जयंती सोहळ्याच्या सहाही दिवस प्रेक्षक व भीमसैनिकांची उपस्थिती लाक्षनीय होती.
- Advertisment -

You cannot copy content of this page