Saturday, December 7, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत येथे आढळला आठ फुटी अजगर, वन्य जीव रक्षकांकडून त्याची वनपरीक्षेत्रात सुखरूप...

कामशेत येथे आढळला आठ फुटी अजगर, वन्य जीव रक्षकांकडून त्याची वनपरीक्षेत्रात सुखरूप रवानगी..

मावळ (प्रतिनिधी): कामशेत मधील कुसगांव या ठिकाणी आढळलेल्या 8 फूटी अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांकडून जीवदान देण्यात आले.
वन्यजीव रक्षक संस्थेचे सोन्या वाडेकर, तेजस शिंदे, कार्तिक गायकवाड यांनी हा 8 फुटी अजगर कामशेत कुसगांव येथे रेस्क्यु केला आहे.कामशेत भागात अजगर साप नेहमी खूप ठिकाणी आढळून येतो. सापला रेस्क्यू केल्या नंतर त्याची माहिती संस्थाचे संस्थापक निलेश संपतराव गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली.त्यावेळी प्रमोद ओव्हाळ, दक्ष काटकर ,यश बच्चे,शुंभम आंद्रे,ओमकार कडू,जिगर सोलंकी यांनी सापाची प्राथमिक तपासणी करून वडगांव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या निदर्शनाखाली त्याला त्याच्या अधिवासात परत सुखरूप सोडून दिले.
आता पावसात भरपूर साप बाहेर पडतात, तरी नागरिकांनी घरात व काम करण्याच्या ठिकाणी काळजी पूर्वक राहिले पाहिजे, कोणत्या ही सापाला न मारता त्याला स्वतःहून जाऊद्या किंवा जवळ पास चे प्राणीमित्र किंवा वनविभागाला कळवा असे आवाहन निलेश गराडे यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page