कामशेत येथे घरफोडीत तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल चोरट्यानी केला लंपास !

0
68

कामशेत : कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घराच्या खिडकीचे ग्रील व कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी एकूण 8 लाख 43 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.4 रोजी दुपारी 2 ते दि.8 रोजी पहाटे 5:40 वा. च्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत अंकित कांतीलाल सोळंकी ( वय 30, व्यव मेडिकल दुकान,रा. ग्रीन मिडोज सोसायटी समोर, कामशेत ) यांनी कामशेत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादी वरून कामशेत पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं.89/2022 भा. द. वी. कलम 457,454,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.4/6/2022 रोजी दुपारी दोन ते दि.8/6/2022 रोजी पहाटे पाच च्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्याच्या आर्थिक फायदयाकरीता फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे कडीकोयंडा व घराच्या बैठकीच्या खोलीच्या लगत असणा-या बेडरूमच्या खिडकीचे ग्रीलचे गज कटरने तोडुन त्यावाटे घरामध्ये प्रवेश करून घरातील दोन बेडरूमधील लाकडी कपाटांचे लॉक उचकटून व घरातील गेस्टरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटुन कपटांमधील 1)1,50,000/-रू रोख त्यामध्ये भारतीय चलनाच्या 100, 200, 500, 2000 दराच्या नोटा,
2.)1,80,000/-रू किमतीच्या सोन्याच्या दोन बांगडया 40 ग्रॅम वजनाच्या,
3.)1,35,000/-रू किमतीच्या सोन्याच्या तीन बांगडया 30 ग्रॅम वजनाच्या,
4.)67,500/- रू किमतीचे सोन्याचे एक हातपान 15 ग्रॅम वजनाचे,
5.)1,57,500/- रू किमतीचे सोन्याचे एक बाजुबंद 35 ग्रॅम वजनाचे,
6.)90,000/- रू किमतीचे सोन्याचे एक मणी मंगळसुत्र 20. ग्रँम वजनाचे,
7.)31,500/- रू किमतीचे सोन्याचे एक जोड कानातील टॉप्स 07 ग्रॅम वजनाचे, 8.)31,500/- रू किमतीचे सोन्याचे एक जोड मनगटी 07 ग्रॅम वजनाचे, 8,43,000/- येणे प्रमाणे वरील वर्णनाचे 1,50,000/-रू रोख रक्कम व 15 तोळे400 ग्रॅम सोन्याचे दागीने असा एकूण रोख रक्कम व 150.400 मि.ली ग्रॅम सोन्याचे दागीने असा एकुण 8,43,000/- रूपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि पवार करित आहेत.