Monday, July 22, 2024
Homeपुणेमावळकार्ला एकविरा विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

कार्ला एकविरा विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

कार्ला- श्री एकवीरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स कार्ला या प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराज जयंंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेचे प्राचार्य संजय वंजारे, जेष्ठ अध्यापिका रेखा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी शिवाज्ञा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते तेजश मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवाज्ञा फाऊंडेशनचे गणेश कुंभार,सचिन हुलावळे,दिनेश हुलावळे यांंच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश इंगुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय हुलावळे तर आभार मुख्याध्यापक संजय वंजारे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक,कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page