if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कार्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एम एच करिअर अकॅडमी च्या वतीने सकाळी 5 वाजता किल्ले कोराई गड येथून शिवज्योत कार्ला येथे आणून शिव जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिवजयंती चे औचित्य साधून एम एच करिअर अकॅडमी च्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच शिवभक्त सतीश साठे यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले.
सदर सत्कार वन परीक्षेत्र अधिकारी विशाल सुनील हरिहर,रेल्वे पोलीस सुशील नाईकनवरे,पोलीस शिपाई आवांती मोहिते, पोलीस शिपाई प्रतीक त्रिंबके, लोको पायलट हेमंत भालेकर, वरिष्ठ सहाय्यक लेखापाल सचिन लोखंडे,मा. सभापती शरद गणपत हुलावळे, कार्ला सरपंच दिपाली दिपक हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन किसन हुलावळे,वर्षा संजय हुलावळे,सोनाली सतीश मोरे,संतोष राम हुलावळे सर,उमेश इंगुळकर सर,व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार एम एच करिअर अकॅडमीचे संस्थापक मितीश नागेश हुलावळे यांनी व्यक्त केले.