कार्ला येथे सामाजिक एकोपा राखत रमजान ईद साजरी..ग्रामीण पोलीस स्टेशन कडून देण्यात आल्या शुभेच्छा !

0
93

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील रहेमत मस्जिद कार्ला व येळसे येथील रुकय्या मस्जिद येथे रमजान ईद सामाजिक एकोपा राखून नमाज पठण करत आनंदाने साजरी करण्यात आली.

यावेळी सामाजिक एकोपा राखत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांसमवेत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टाफ यांनी पवित्र रमजान ईद या सणानिमित्त कार्ला येथील रहेमत मस्जिद आणि येळसे येथील रुकय्या मस्जिद येथे उपस्थित राहून दोन्ही ठिकाणी मुस्लिम बांधवांना लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पुष्पगुच्छ, बुके देऊन मौलाना व मुस्लिम बांधवांना पवित्र ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याचबरोबर कार्ला येथील रहेमत मस्जिद येथे मस्जिद लगतच हिंदू बांधवांचे महालक्ष्मी मंदिर आहे तसेच मस्जिद समोर रामोशी समाजाचे समाजमंदिर आहे. गावातील सर्व समाजातील प्रतिनिधी मस्जिद येथे हजर राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन ईद साजरी केल्याबद्दल परिसरात कौतुक केले जात आहे.


यावेळी ग्रामीण पोलीस,कार्ला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच यावेळी रमजान ईद चे औचित्य साधून कार्ला ग्रामपंचायत च्या वतीने कार्ला रहेमत मस्जिद येथे मुस्लिम बांधवांना पुष्प गुच्छ, लाडू व जेवण तयार करण्यासाठी आवश्यक भांडी भेट म्हणून देण्यात आली.

यावेळी लोणावळा ग्रामीण पो पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व पोलीस स्टाफ यांसमवेत कार्ला ग्रामपंचायतचे किरण हुलावळे, अभिषेक हुलावळे, संतोष मोरे, महिला ग्रामपंचायत सदस्या, पोलीस पाटील,मौलाना अब्दुल रहेमान शेख, ट्रस्टचे रजाक मणियार व इतर ट्रस्टी उपस्थित होते.

सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन आनंदी वातावरणात ईद साजरी केल्याने खरोखरच सामाजिक एकोप्याचे पवित्र दर्शन या पवित्र सणाच्या वेळी घडले आहे. या एकोप्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.