Sunday, December 8, 2024
Homeपुणेमावळकार्ला येथे सालाबादप्रमाणे लोहगड व विसापूर किल्यावरून येणाऱ्या शिव ज्योतिचे स्वागत व...

कार्ला येथे सालाबादप्रमाणे लोहगड व विसापूर किल्यावरून येणाऱ्या शिव ज्योतिचे स्वागत व अल्पउपहार वाटप…

कार्ला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध गड किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतींचे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ऐतिहासिक कार्ला नगरी येथे भव्य स्वागत व शिवभक्तांना अल्पोपाहाराचे वाटप वारकरी सांप्रदायातील प्रवचनकार, किर्तनकार व कार्ला ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त युवा सेना तालुकाध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने लोहगड व विसापूर किल्यावरून पहाटे 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत येणाऱ्या शेकडो शिवज्योतींचे स्वागत व हजारो शिवभक्तांना अल्पोपाहाराचे वाटप गेली अकरा वर्ष सातत्याने करण्यात येत आहे.
यावेळी ह.भ.प गणेश महाराज फलके,ह.भ.प दिलीप महाराज खेंगरे,ह.भ.प प्रकाश महाराज जाधव,ह.भ.प सोमनाथ महाराज सावंत,ह.भ.प अनंता महाराज शिंदे,ह.भ.प अकुंश महाराज वाघीरे,ह.भ.प भाऊसाहेब मापारी इ.उपस्थित होते.
तर यासाठी दिलीप विठ्ठल हुलावळे,बाळु रघुनाथ हुलावळे,सचिन शिर्के,भाऊसाहेब हुलावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page