कार्ला विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदावर एकनाथ गायकवाड बिनविरोध…

0
111

कार्ला : कार्ला विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी वेहेरगाव येथील एकनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिलाटणे , वेहरगाव , दहिवली , कार्ला गाव मिळून कार्ला विविध कार्यकारी सोसायटी असून या सोसायटीचे अध्यक्ष विलास कुटे यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी निवडणुक घेण्यात आली होती . यावेळी गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे , मावळ तालुका सचिव संघटना अध्यक्ष गणपत भानुसघरे , शिवसेना मावळ संघटक सुरेश गायकवाड , सोसायटीच्या उपाध्यक्षा ताराबाई हुलावळे , कार्ला उपसरपंच व संचालक किरण हुलावळे , खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन व संचालक भाऊसाहेब मावकर , माजी चेअरमन विठ्ठल हुलावळे , प्रसाद हुलावळे , संगिता भानुसघरे , संचालक शिवाजी कोंढभर , किसन आहिरे , शिवराम धुमाळ , राम भानुसघरे , तज्ञसंचालक नितिन वाडेकर , शत्रुघ्न देवकर , पांडुरंग भानुसघरे , सोसायटीचे सचिव सचिन भानुसघरे , राजु देवकर , संदिप देवकर , संतोष गायकवाड , सागर जाधव , अनंता हुलावळे ,वेहेरगाव ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड , सागर जाधव , अनंता हुलावळे , शेखर गायकवाड , प्रविण गायकवाड , अजय देवकर , अनिल देवकर आदींनी यावेळी गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.