कार्ला MTDC जवळ रिक्षा व पिकअप पलटी होऊन अपघात ,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही..

0
51

कार्ला : एम टी डी सी जवळील तरे पेट्रोल पंपाजवळ मुंबई पुणे महामार्गावर पिकअप व रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात झाला.

प्राथमिक माहितीनुसार कार्ला एम टी डी सी जवळील तरे पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी सहा च्या सुमारास रिक्षा व पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी रिक्षाचा चुराडा झाला आहे.

रिक्षा क्र. MH 12 KR 5059 व पिकअप टेम्पो क्र. MH 05 DK 0609 या वाहनांचा अपघात झाला आहे. यामधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, दोन्ही वाहनातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.