कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार नदी पात्रात पडल्याने एकाचा मृत्यू…

0
85

इंदोरी : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून जाणारी वॅगनर कार थेट इंद्रायणी नदीपात्रात कोसळल्याची दुर्घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे आज मध्यरात्री घडली . या दुर्घटनेत कारमधील एकाचा मृत्यू झाला.

संजय पुनमचंद बोरसे ( वय 43 , रा . मनोहरनगर , तळेगाव स्टेशन , ता . मावळ , जि . पुणे ) असे अपघातातील मृताचे नाव आहे . मयत संजय बोरसे हे चाकण मधील एका कंपनीस कामास होते . चाकण बाजूकडून तळेगावच्या दिशेने कार येत असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीपात्रात कोसळली.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , एक कार नदीपात्रात पडली असून मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची खबर शुक्रवारी सकाळी पोलिसांना मिळाली .त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ , पोलीस प्रशासन आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे , गणेश निसाळ , भास्कर माळी , अविनाश कार्ले , वैभव वाघ , मयूर दाभाडे , अनिश गराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार आणि मृतदेह सकाळी 9: 00 च्या सुमारास नदीपात्राच्या बाहेर काढला . पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.