कासारसाई धरणात बुडाल्याने वाकड येथील 14 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू…

0
41

चांदखेड : मावळातील कासारसाई धरणावर कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलाचा धरणाच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि.22 रोजी सकाळच्या सुमारास घडली.प्रदुम गायकवाड ( वय 14 , रा . कस्पटे वस्ती वाकड ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.शिरगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रदुम व त्याचे आई , वडील , भाऊ , बहीण असे 7 जण रविवार दि .22 रोजी सकाळी 11 वाजता कासारसाई धरणावर फिरण्यासाठी आले होते .

प्रदुम व त्यांच्या घरचे पाण्यात उतरले असताना प्रदुमचा पाय घसरुण पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यु झाला . स्थानिक नागरिक राजाराम केदारी यांच्यासह शिवदुर्ग रेसक्यु टीम गणेश ढोरे , प्रविण देशमुख , अजय शेलार , भास्कर माळी , हर्षल चौधरी सह ग्रामस्थ यांनी पाच तास अथक प्रयत्न करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला.कुसगावचे पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी घटनेची माहिती शिरगाव – परंदवडी पोलीस स्टेशनला दिली . मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे पाठविण्यात आला आहे. शिरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक बी . सी गावीत पुढील तपास करत आहेत.