किरवली रा.जि.प. शाळा येथे शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा !

0
94

नवागतांचे स्वागत , मोफत पाठ्यपुस्तक वाटप व शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन…

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद – किरवली शाळेत आज दि . १५ जून २०२२ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या नवागतांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले . त्याचप्रमाणे शाळापूर्व तयारी मेळावा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.हिरामण गायकवाड , सौ.आरतीताई बडेकर , शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मा.श्री प्रभाकर बडेकर , उपाध्यक्ष मा.श्री.विश्वनाथजी बडेकर , पोलीस पाटील मा.श्री.विवेक बडेकर , कमिटी सदस्या सौ.आशाताई सुरळकर , सौ. प्रमिलाताई म्हसे , किरवली शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ.प्रिय्ंका हरवंदे मॅडम , शाळेतील सर्व शिक्षकवृंद अंगणवाडीच्या सौ. साळोखे , मदतनीस सौ.बडेकर , पालक वर्ग आणि शाळेतील सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.


शाळेचा पहिला दिवस कायमस्वरूपी लक्षात रहावा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या कार्यक्रमांतर्गत प्रथम उपस्थितां समवेत गावात प्रभातफेरी काढण्यात आली. यांत ” चला – चला शाळेत जाऊ , नका कोणी घरी राहू ” , प्रत्येक मूल शाळेत जाईल , एक ही मूल घरी न राहील , असे फलक घेऊन विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते . त्यानंतर इयत्ता १ लीत दाखलपात्र विद्यार्थी आणि इतर वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या नवागतांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करुन इयत्ता निहाय जिल्हा परिषदेकडून आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक वर्गांनी शाळापूर्व तयारीच्या मेळाव्याची प्रत्यक्षात दाखलपात्र विद्यार्थ्यांची प्रत्यक्षकृती द्वारे विकास पत्रात नोंद करून घेतली.शालेय वातावरण व सुशोभीकरण सुंदररीत्या करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.