लोणावळा (प्रतिनिधी): प्रकाश पोरवाल यांनी सोशल मीडिया वर नुकतिच वायरल केलेली नितिन अग्रवाल यांचे बाबतची एक बदनामी कारक पोस्ट पोरवाल यांना चांगलीच भोवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
राष्ट्रीय ख्यातीप्राप्त भाजपा चे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांच्या सोबत कुठेतरी गर्दीमध्ये घाईघाईत काढलेल्या फोटो सोबत प्रकाश पोरवाल यांनी चक्क ” त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन लवकरच अगरवाल यांचे घोटाळे बाहेर काढू असे आश्वासन सोमय्या यांनी दिले” या आशयाची पोस्ट वायरल केली आहे.
याबाबत अगरवाल कुटुंबियांनी थेट सोमैया यांना खुलासा मागीतला.त्यावेळी किरीट सोमैया यांनी सदर प्रकरणी जातीने लक्ष घालुन पोरवाल यांना या बाबत जाब विचारला असता सदर आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याची कबुली पोरवाल यांनी सोमैया यांना दिली असे किरीट सोमैया यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे .
एवढेच नाही तर सोमैया यांनी लोणावळा पोलीस स्टेशन येथे सुद्धा पत्र लिहून सदर बाब कळवली आहे . असे खोटे आरोप करुन व नामवंत राजकिय पुढाऱ्यांसोबतचे फोटो वायरल करुन सरकारी अधिकारी यांच्यावर दबाव तंत्र आणण्याची पोरवाल यांची ही जुनी पद्धत आता पोरवाल यांना चांगलीच भोवणार आहे . यासंदर्भात नितीन अगरवाल हे प्रकाश पोरवाल याच्या विरुद्ध पोलीसात तक्रार करणार असलयाची माहिती नितीन अगरवाल यांनी दिली आहे.
तसेच पोरवाल यांनी विविध ठिकाणी अशाच खोटया तक्रारी केल्या असून त्यांच्या ह्या तक्रारीना काही अर्थ नाही अशा या बोगस तक्रारीतून काहीच निष्पन्न होणार नाही, उलट पोरवाल यांना खोटी तक्रार केल्याबाबत कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार हे मात्र नक्की असेही नितिन अगरवाल यांनी सांगितले आहे.