Monday, June 23, 2025
Homeपुणेतळेगावकिशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन..

किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन..

तळेगाव : किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तळेगाव दाभाडे यशवंत नगर येथील उद्योग धाम वसती गृहातील लहान मुलांसोबत केक कापण्यात आला.

किशोरभाऊ आवरे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उद्योग धाम वसती गृहातील लहान मुलांसोबत केक कापून त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच वसतिगृहा मध्ये किराणा सामानाचे वाटप करून किशोर भाऊ आवारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष विक्की लोखंडे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्ष सुनिल पवार,लोणावळा शहर अध्यक्ष जयेश देसाई,लोणावळा शहर उपाध्यक्ष यश रिले,वडगाव शहर उपाध्यक्ष अजय भालेराव,उपाध्यक्ष आशिष भालेराव,
कामशेत शहर अध्यक्ष दत्ता शिंदे, कामशेत शहर उपाध्यक्ष उमेश पटेकर, अभिजित चांदेकर, लोणावळा शहर उपाध्यक्ष मंगेश गोसावी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page