Saturday, November 2, 2024
Homeपुणेमावळकुंडमळा दुर्घटना: वाहून गेलेल्या तरुण-तरुणीचा मृतदेह शोधण्यात यश..

कुंडमळा दुर्घटना: वाहून गेलेल्या तरुण-तरुणीचा मृतदेह शोधण्यात यश..

इंदोरी मावळ : – इंदोरीजवळील कुंडमळा येथे गुरुवार (दि. ५) रोजी सेल्फीच्या नादात तरुणीचा पाय घसरल्याने ती आणि तिला वाचवण्यास गेलेल्या तरुणाचा वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला. मृतांची नावे रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे (वय २२, रा. चिंचवड) आणि श्रेया सुरेश गावडे (वय १७, रा. चिंचवड) अशी आहेत.
घटनेची माहिती अशी की, रोहन आणि श्रेया हे गुरुवार रोजी सकाळी त्यांच्या मित्रांसोबत कुंडमळा येथे फिरायला गेले होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास श्रेयाचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात रोहन पाण्यात उतरला, मात्र पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने दोघेही वाहून गेले. घटनास्थळी तात्काळ शोध मोहीम राबवली गेली. गुरुवारीच रोहनचा मृतदेह हाती लागला, तर श्रेयाचा मृतदेह आज (दि. ७) रोजी सकाळी सापडला.
या शोध मोहिमेत वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र आणि तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाचे जवान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, राजेंद्र बांडगे, रवी कोळी, शुभम काकडे, सत्यम सावंत, अनिश गराडे, राजु सय्यद, आणि कमल परदेश यांच्या अथक प्रयत्नांतून श्रेयाचा मृतदेह आज सकाळी शोधण्यात यश आले. ह्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page