Tuesday, November 29, 2022
Homeपुणेलोणावळाकुरवंडे येथील मयूर फाटक याच्या उपचारासाठी रोटरी क्लब कडून आर्थिक मदत..

कुरवंडे येथील मयूर फाटक याच्या उपचारासाठी रोटरी क्लब कडून आर्थिक मदत..

लोणावळा(प्रतिनिधी): कुरवंडे येथील रहिवासी मयूर तानाजी फाटक या पंधरा वर्षीय तरुणाच्या उपचारासाठी रोटरी क्लब च्या वतीने 21 हजाराचा धनादेश देऊन जपली माणुसकी.
मयूर फाटक याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असून फाटक कुटुंबास आर्थिक मदत मिळावी याबाबतची विनंती पत्रकामार्फत कुरवंडे ग्रामपंचायतने रोटरी क्लबला केली होती.
रोटरी क्लब ने सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ 23 सप्टेंबर रोजी 21 हजाराचा धनादेश रुग्णाचे वडील तानाजी फाटक यांना सुपूर्द केला तसेच 1 हजार रुपये रोख दिले .
या प्रसंगी रोटरी क्लबचे सभासद , जेष्ठ नागरिक संघ पदाधिकारी तसेच कुरवंडे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . समाजातील अडचणीतील गरजू लोकांना मदत करत रोटरी क्लब ने रोटरी मूल्यांची परत एकदा सामाजिक बांधिलकीची ओळख करून दिली .
- Advertisment -

You cannot copy content of this page