Tuesday, November 29, 2022
Homeपुणेकामशेतकुसगांव खुर्दचे सरपंच आठ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात...

कुसगांव खुर्दचे सरपंच आठ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात…

कामशेत (प्रतिनिधी) : मावळातील सरपंच व त्याला 8 हजार रुपयांची लाच घेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले . काल शुक्रवार दि .30 रोजी लाचलुचपत विभागाने कुसगाव ग्रामपंचायत कार्यालयात ही कारवाई केली.
या कारवाईत कामशेत येथील कुसगाव खुर्दचे सरपंच अनिल बाळू येवले ( वय 33 , रा . कुसगाव ) व ग्रामसेवक अमोल बाळासाहेब थोरात ( वय 34 ) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तक्रारदाराने 26 सप्टेंबर रोजी चुलत आजोबाच्या मृत्यूनंतर त्याचे मृत्यूप्रमाणपत्र मिळावे म्हणून ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता . मात्र , हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरपंच येवले याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली . तडजोडी अंती 8 हजार रुपये देण्याचे ठरले . या लाच मागण्यासाठी ग्रामसेवक थोरात याने सरपंच येवलेला प्रोत्साहन दिले.
ठरल्यानुसार शुक्रवारी 8 हजारांची लाच घेत असताना ग्रामपंचायत कार्यालयातच लाचलुचपत विभागाने रंगेहात आरोपींना पकडले . पुढील तपास लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधिक्षक सीमा आडनाईक करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page