Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मविआ चा 18 पैकी 17 जागांवर दणदणीत...

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मविआ चा 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय…

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीची मतमोजणी आज शनिवारी पार पडली. यात बाजार समितीवर राष्ट्रवादी प्रणित मविआ पॅनलने 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर भाजपला अवघी एक जागा मिळाली.
आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगरपंचायत, नगरपरिषद,महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. याच निवडणुकीवर आगामी काळातील निवडणुकीचे भविष्य ठरेल असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.आमदार सुनील शेळके यांचा दावा खरा ठरला. विकास कामांच्या जोरावरच जनतेचा विश्वास प्राप्त केला. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागा राष्ट्रवादी प्रणित मविआ पॅनलला मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जल्लोष व उत्साह वाढला. निवडणुकीत विजय प्राप्त झाल्याने मावळ पंचायत समिती ते ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिवाजी घुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र नेहुल, मतमोजणी अधिकारी अशोक मारणे, प्रवीण धमाल, जितेंद्र विटकर, गंगाधर कोत्तावार,पोलीस निरीक्षक विलास भोसले व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव पोलीस अंमलदार संजय सुपे, सुनील जावळे, शशिकांत खोपडे व बहुसंख्य पोलीस अंमलदारांनी निवडणूक शांततेत उत्तम नियोजनात पारदर्शक पद्धतीने मतमोजणी करून निकाल घोषित केला.
भाजप प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय सहकार परिवर्तन पॅनलला 18 जागांपैकी व्यापारी मतदार संघात नामदेव ज्ञानेश्वर कोंडे विजयी झाले. भाजपला 18 पैकी एकच जागा मिळाली. भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद,महानगरपालिका निवडणुकात भाजपचे चित्र काय राहणार हे मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले.

You cannot copy content of this page