Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाकॅन्सर च्या आजाराला कंटाळून लोणावळ्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या…

कॅन्सर च्या आजाराला कंटाळून लोणावळ्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या…

लोणावळा (प्रतिनिधी): आजाराला कंटाळून एका 42 वर्षीय तरुणाने ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला लटकून गळफास घेतल्याची घटना मंगळवार दि.13 रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास बारा बंगला येथे घडली.
अनंता तुकाराम पाटोळे ( वय 42, रा. जुना खंडाळा, ता. मावळ, जि. पुणे ) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मयत दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत अनंता पाटोळे यांना कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते. त्याच नैराशातून त्यांनी बारा बंगला, किंगसिंग हॉटेलच्या मागे राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद लोणावळा शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार उंडे करत आहेत.

You cannot copy content of this page