केंद्र सरकार विरोधात पुणे जिल्हा महिला काँग्रेसचे लोणावळ्यात निषेध आंदोलन..

0
229

लोणावळा : पुणे जिल्हा महिला काँग्रेस चे केंद्र सरकार विरोधात लोणावळा छत्रपती शिवाजी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

मोदी सरकारच्या महागाई व अन्यायकारक, जुल्मी धोरणा विरुद्ध तसेच ” बेटी पढाओ, बेटी पटाओ ” या उद्गाराबाबत केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या ऊपाध्यक्षा संगिताताई तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग नाना चव्हाण-पाटील व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव सिमाताई सावंत यांच्या प्रमुख ऊपस्थितीमध्ये पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.किरणताई काळभोर यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा येथे दुपारी 12:30 वा. हे निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनास लोणावळा शहर काँग्रेस महिला अध्यक्षा पुष्पाताई भोकसे तसेच लोणावळा शहर काँग्रेसचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होते.