![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी) : मावळ तालुका शिवसेना संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने भांगरवाडी येथील अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला.
शिवसेना माजी विभागप्रमुख विशाल पाठारे यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, माजी नगरसेविका अपर्णाताई बुटाला, माजी नगराध्यक्षा श्रीमती शिलाताई बनकर, विभागप्रमुख इंद्रजीत तिवारी, संघटक अविनाश शिंदे, माजी विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख महेश खराडे, माजी विभागप्रमुख सुनिल इंगुळकर, माजी उपसरपंच शामबाबू वाल्मिकी, युवा सेनेचे अजय ढम, सतीश गोणते, चिराग खराडे, भागेश शिंगरे, निलेश कशाळे, प्रथमेश पाठारे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष संजय तळेकर, दीपक ठाकर, विजय गावडसे, महिला आघाडीच्या नंदा पाठारे, वैशाली नापित, ज्योती पवार, कांचन सोनवणे, संगीता घोडके , सुमन पोंगडे, भाग्यश्री घोगळे, डॉ किशोर, डॉ अरविंद आदी मान्यवर उपस्थित होते.