Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कोण कुणाला हत्तीच्या पायाखाली तुडवतो " हि वेळच ठरवेल-मा.राजिप उपाध्यक्ष सुधाकर...

” कोण कुणाला हत्तीच्या पायाखाली तुडवतो ” हि वेळच ठरवेल-मा.राजिप उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे..

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या जहरी टिकेला जशास तसे उत्तर….

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) जर तुम्ही सूर्यावर थुंकले , तर ती थुंक तुमच्यावरच येणार , म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्यावर टिका कराल तर ती तुमच्यावरच येईल , कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे हे ” अपघात ” परिस्थितीत झालेले आमदार असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीतील उच्च पदस्थ नेते सुनील तटकरे साहेब यांच्यावर केलेली टिका हि अशोभनीय असून आमदारांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो , असे खडे बोल कर्जत खालापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत सुनावले .

यापुढे आमच्या नेत्यांची अशी टिका आम्ही सहन करणार नसून यावर सडेतोड उत्तर देवू , असा घणाघाती आघात त्यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वर केला . आज दिनांक २४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५ – ०० वाजता घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत कर्जत खालापुर मतदार संघाचे नेते तथा राजिप चे मा . उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव , प्रदेश सरचिटणीस भरत भाई भगत , कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे , मनीष यादव , अमोल पाटील , माथेरानचे मा . नगराध्यक्ष सांवत , महिला अध्यक्षा रंजना धुळे , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , बंधू देशमुख , नगरसेवक उमेश गायकवाड , युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील पालकर , जिल्हा नेते बाबू पोटे , राजाभाऊ कोठारी सर् , कशेळे चे हरपुडे , ऍड. निगुडकर , सोमनाथ पालकर , केतन बेलोसे , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी सुधाकर भाऊ घारे पुढे म्हणाले की , विकासाचा मुद्दा घेवून आम्ही 2 जुलै 2023 रोजी महायुतीत गेलो , महायुतीत घटक पक्ष असताना देखील काल पेण येथे झालेल्या सभेत आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे साहेबांवर जहरी टीका केली , तटकरे साहेब आजच्या स्थितीला युतीत उच्च स्थानावर आहेत , त्यामुळे त्यांच्यावर केलेली टिका आम्ही सहन करू शकत नाहीत , आताचे आमदार हे पहिल्या टर्म मध्ये आमदार झालेले असून ते अपघाताने आमदार झालेले आहेत , म्हणून त्यांनी केलेली जहरी टिका हि ” सूर्यावर थुंकतो ” अशी असून ती थुंक त्यांच्याच तोंडावर उडणारी आहे , यावर प्रकाश टाकला , तर त्यांचे वक्तव्य चुकीचे असून कर्जत तालुक्यातील मायबाप जनता भविष्यात ठरवतील कुणाला निवडून द्यायचं ते , यावर ते पुढे म्हणाले की , तटकरे साहेबांचा ” कडेलोट करू ” , हे वेळ आल्यावर समजेल , कोण कुणाला हत्तीच्या पायाखाली तुडवतो , हे दिसणार आहे . आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते युतीचा धर्म पाळत आहे.


अश्या टिकेमुळे महायुतीतील वातावरण खराब करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जाहीर निषेध करत , आमचे पक्ष प्रवेश बघुन आमदार महेंद्र थोरवे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे , म्हणूनच असे बेताल वक्तव्य ते करत असून , माझा माझ्या पक्षावर व महायुतीवर पूर्ण विश्वास आहे , म्हणूनच या मतदार संघात सर्वाँना तिकीट मागण्याचा अधिकार आहे , असे संतप्त मत सुधाकर भाऊ घारे त्यांनी व्यक्त केले.


तर प्रदेश सरचिटणीस भरत भाई भगत यांनी महायुतीत राहून आम्ही प्रामाणिक काम करत असून आमदार महेंद्र थोरवे यांनी जहरी टिका करून येथील वातावरण खराब करून मावळचे खासदार व आताचे संभाव्य उमेदवार आप्पासाहेब बारणे यांची ” विकेट ” तर पाडत नाहीत ना , अशी शंका व्यक्त केली , व त्यांनी हि जाहीर निषेध व्यक्त केला , प्रदेश चिटणीस अशोक भोपतराव म्हणाले की , महायुतीच्या निर्णयानुसार नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे . असे असताना आपला मतदार सोडून दुसर्याच्या मतदार संघात जाऊन चुकीचे वक्तव्य करायचे , ते ही आमचे पक्ष श्रेष्ठी सुनीलजी तटकरे साहेब यांच्या विरोधात , ते आम्ही सहन करणार नसून आमच्या नेत्यांना ” कडेलोट ” करण्याची भाषा हे वक्तव्य निंदनीय आहे , त्यांनीही निषेध व्यक्त केला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली . त्यामुळे ऐन होळीत येथील राजकीय वातावरण तप्त झाले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page